भारत आणि इंग्लंड वनडे मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने जबरदस्त कामगिरी केली. इंग्लंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय त्यांच्या अंगलट आला असंच म्हणावं लागेल. आयुष म्हात्रे स्वस्तात बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशी आणि विहान मल्होत्रा यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 219 धावांची भागीदारी केली. विहान मल्होत्राने 121 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकार मारत 129 धावा केल्या. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचं वादळ घोंघावळं. त्याने 78 चेंडूत 13 चौकार आणि 10 षटकार मारत 143 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 183.33 चा होता. त्यानंतर राहुल कुमार आणि हरवंश पंगालिया खातं न खोलता बाद झाले. पण कर्णधार अभिग्यान कुंडूने 23 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे संघाच्या धावा 300 पार जाण्यास मदत झाली. भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 363 धावा केल्या. तसेच विजयासाठी 364 धावांचं आव्हान दिलं.
इंग्लंडकडून तझीम अली आणि राल्फी अल्बर्ट हे सर्वात महागडे गोलंदाज ठरले. अलीने 10 षटकात 97 धावा दिल्या. तसेच एकही विकेट मिळाला नाही. तर राल्फी अलबर्टने 10 षटकात 71 धावा दिल्या. त्यालाही विकेट मिळाली नाही. इंग्लंडकडून जॅक होमने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर सॅबेस्टियन मॉर्गनने 3, जेम्स मिंटोने 1 आणि बेन मायजने 1 गडी बाद केला.
इंग्लंडला मालिका वाचवण्यासाठी हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. अन्यथा भारत पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 3-1 ने बाजी मारली. शेवटच्या सामन्याला तसा काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे इंग्लंडला हा सामना जिंकणं भाग आहे. पण धावांचा डोंगर पाहता इंग्लंडला हा विजय शक्य आहे का? हे देखील तितकंच खरं आहे.
इंग्लंड अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): बेन डॉकिन्स, बेन मेयेस, जोसेफ मूर्स, रॉकी फ्लिंटॉफ, थॉमस र्यू (कर्णधार), राल्फी अल्बर्ट, सेबॅस्टियन मॉर्गन, जॅक होम, जेम्स इस्बेल, जेम्स मिंटो, तझीम चौधरी अली.
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, राहुल कुमार, हरवंश पंगालिया, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर/कर्णधार), कनिष्क चौहान, आरएस अंबरिश, दीपेश देवेंद्रन, युधाजित गुहा, नमन पुष्पक