झाकीर नाईक आणि राज ठाकरे… गुणरत्न सदावर्ते यांची टीका काय?
GH News July 05, 2025 10:06 PM

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाचा एकत्र विजयी मेळावा आज मुंबईत पार पडला. मराठी भाषा टिकवण्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. या मेळाव्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही काही नेते उपस्थित होते. या मेळाव्यानंतर जेष्ठ कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. सदावर्तेंनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

राज ठाकरे खोटं बोलत आहेत – सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, ‘तुमच्या अवलादी कुठे शिकल्या याच्याशी आम्हाला काय घेणं देणं आहे. राज ठाकरे तुम आज भी झूठी बाते कर रहे हो. तुम झुठे हो. मी पुरावे देतो. ऐका हो ऐका हो राज ठाकरेंचे पितळ उघडं करतो. ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांनो ऐका. तुम्हाला इंग्रजीची गोडी आहे त्याला तुमचा विरोध नाही.’

राज ठाकरे झाकीर नाईकांसारखं बोलत आहेत

पुढे बोलताना सदावर्ते म्हणाले की, ‘राज ठाकरे भाषेच्या नावावर देश तोडायला निघाले का? राज ठाकरे अतिरेक्यांची भाषा करत आहेत. पुरावे कशे नष्ट करायचे ही भाषा अतिरेक्यांची आहे. रजा अकादमीवाला झाकीर नाईक आणि राज ठाकरे एका शाळेत शिकलेत का? राज ठाकरे आणि माझे विचार एक होऊ शकत नाहीत. झाकीर नाईक आणि राज ठाकरे सारखं बोलतात. आम्ही सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नथुराम गोडसे यांच्या विचारांवर चालतो.’

केडिया यांचा देशाच्या हितासाठीचा त्रागा होता

व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठी बोलणार नाही, शिकणार नाही असं विधान केलं होतं. यावर बोलताना सदावर्ते म्हणाले की, केडिया यांचा देशाच्या हितासाठीचा त्रागा होता, राज ठाकरे-उध्दव ठाकरेंमुळे रोजगाराचे मोठे नुकसान होत आहे. दगडाच्या ठिकाणी नारळ वापरला, तोडफोडीसाठी नारळाचा वापर हे कोणत हिंदूत्व आहे? असा सवालही सदावर्तेंनी राज ठाकरेंना विचारला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.