Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
esakal July 05, 2025 10:45 PM

Devendra Fadnavis calls Uddhav Thackeray’s speech a "Rudali show" : वरळीत आज मराठी विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच व्यासपीठावर दिसले. यावेळी बोलताना राज आणि उद्धव ठाकरेंनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मराठीसाठी कोणताही तडजोड करणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. दरम्यान, दोघांच्या भाषणानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

अशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशी निमित्त पंढपूरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांना मराठी विजय मेळाव्याबाबतही विचारण्यात आलं. यावर बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंना रुदालीची उपमा देत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

CM Devendra Fadnavis : अधिक व्याजाच्या योजनांविरोधात विशेष मोहीम; नागरिकांनी अशा योजनांना बळी पडू नये नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

"मी राज ठाकरे यांचे आभार मानतो. त्यांनी दोन भावांना एकत्र येण्याचं श्रेय मला दिलं. त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद मलाच मिळत असतील'', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकाही केली. ''मला असं सांगण्यात आलं होतं, की आज मराठीचा विजयी मेळावा आहे. पण त्याठिकाणी रुदालींचं भाषणही झालं. त्यांनी मराठीबाबत एक शब्द न बोलताना आमचं सरकार पाडलं, आमचा पक्ष फोडला, हे रडगाणं सुरू होतं. हा मराठीचा विजय नव्हता, तर रुदाली होती. या रुदालीचं दर्शन या ठिकाणी झालं'', असं ते म्हणाले.

Raj Thackeray : ''...अन् बाळासाहेबांनी मराठीसाठी सत्तेवर लाथ मारली''....राज ठाकरेंनी सांगितला २६ वर्षांपूर्वीचा तो किस्सा!

''या लोकांना असुया आहे, की २५ वर्ष त्यांच्या हातात मुंबई महापालिका असताना दाखवण्यासारखं काहीही काम करू शकले नाहीत. पण मोदींच्या नेतृत्वात आम्ही मुंबईचा चेहरा बदलवला. चाळीत राहणाऱ्या अनेक मराठी नागरिकांना त्याच ठिकाणी त्यांच्या हक्काचं घर दिलं. त्याची असुया त्यांच्या मनात आहे. पण जनतेला सर्व कळतं, असंही त्यांनी सांगितलं."

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.