जगभरातील देशांचा पाकिस्तानवरील विश्वास उडाला आहे. याचा परिणाम पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे. कारण अनेक परदेशी कंपन्या पाकिस्तानमधून माघार घेत आहेत. अलिकडेच एका बड्या कंपनीने 25 वर्षांनंतर पाकिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने पाकिस्तानमधील आपले कार्यालय पूर्णपणे बंद केले आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
मायक्रोसॉफ्टचा पाकिस्तानमधून बाहेर पडण्याचा निर्णय
जगातील सर्वोत्तम टेक कंपन्यांपैकी एक कंपनी असलेल्या मायक्रोसॉफ्टने कर्मचारी करण्याच्या आपल्या धोरणाचा भाग म्हणून पाकिस्तानमधील आपले मर्यादित कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने 25 वर्षांनंतर पाकिस्तानमधील आपले कार्यालय बंद केले आहे. तसेच कंपनीने या काळात जगातील 9100 कर्मचाऱ्यांचीही कपात केली आहे.
मायक्रोसॉफ्टने पाकिस्तान सोडण्याचा निर्णय का घेतला?
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानचे अधिकारी जवाद रहमान यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे देशाबाहेर पडण्याचा निर्णय सध्याचे व्यावसायिक वातावरण पाहून घेण्यात आला आहे. रेहमान यांनी लिंक्डइनवर लिहिले की मायक्रोसॉफ्टसारख्या दिग्गज कंपन्यांनाही पाकिस्तानात राहणे धोक्याचे वाटत आहे.
अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा
पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये मायक्रोसॉफ्टच्या निर्णयाबद्दल चिंता व्यक्त केली. अल्वी यांनी म्हटले की, ‘हे देशाच्या आर्थिक भविष्यासाठी खराब लक्षण आहे. मायक्रोसॉफ्टने एकेकाळी आपल्या विस्तारासाठी पाकिस्तानचा विचार केला होता, मात्र देशातील आर्थिक अस्थिरतेमुळे कंपनीने नंतर व्हिएतनामची निवड केली. याचा फटका पाकिस्तानला बसणार आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनी काय काम करते?
मायक्रोसॉफ्ट ही एक अमेरिकन टेक कंपनी आहे. ही कंपनी सॉफ्टवेअर, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक आणि त्याच्या संबंधित सेवा देते. मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, ऑफिस सूट (वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट) आणि इतर ॲप्लिकेशन्स विकसित करते आणि विकते.
तसेच ही कंपनी ॲझ्युअर सारख्या क्लाउड-आधारित सेवा, जी कंपनयांसाठी डेटा स्टोरेज, ॲप डेव्हलपमेंट आणि इतर सेवांसाठी वापरली जाते. तसेच ही कंपनी लॅपटॉप आणि टॅब्लेट, एक्सबॉक्स गेमिंग कन्सोल आणि इतर उपकरणांवरही काम करते.