Shubman Gill : द्विशतकानंतर आता तडाखेदार शतक, कॅप्टन शुबमनचा एकाच सामन्यात ऐतिहासिक कारनामा, ठरला दुसरा भारतीय
GH News July 06, 2025 12:09 AM

टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल याला रोखणं इंग्लंडसाठी अवघड झालं आहे. शुबमनने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात ऐतिहासिक द्विशतक ठोकलं आणि असंख्य विक्रम उद्धवस्त केलं. त्यानंतर आता शुबमनने दुसऱ्या डावात तडाखेदार शतक करत इतिहास रचला आहे. शुबमन एका कसोटी सामन्यात द्विशतक आणि शतक करणारा एकूण नववा तर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. शुबमनने यासह भारताचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

शुबमनने 129 बॉलमध्ये 77.52 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. शुबमनने या शतकी खेळीत 3 षटकार आणि 8 चौकार लगावले. शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे आठवं शतक ठरलं. शुबमनच्या शतकासह भारताची आघाडी 483 धावांची झाली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.