'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) हा चित्रपट 4 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'मेट्रो इन दिनों' हा रोमँटिक ड्रामा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले आहे.'मेट्रो इन दिनों' हा चित्रपट 'लाइफ इन अ मेट्रो' या 2007 साली रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटाने दोन दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला जाणून घेऊयात.
View this post on InstagramA post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)
तगडी स्टारकास्ट असलेला 'मेट्रोइन दिनों'ने बॉक्स ऑफिसवर आपली जागा तयार करायला सुरूवात केली आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी खूपच कमी कमाई केली. मात्र वीकेंडला 'मेट्रो इन दिनों' चित्रपटाने बाजी मारली आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी वीकेंडला'मेट्रो इन दिनों'ने बंपर कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत वाढ झालेली पाहायला मिळत आहे. चित्रपट आता लवकरच 10 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.
चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.5 कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी 6 कोटी रुपये कमावले आहे. दोन चित्रपटाचे एकूण कलेक्शन 9.5 कोटी रुपये झाले आहे. आता रविवारी चित्रपट काय जादू दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच प्रेक्षकांच्या रिव्ह्यूमधून असे दिसून येते की, चित्रपटाची कथा आणि गाणीप्रेक्षकांना खूप आवडली आहे. त्यामुळे भविष्यात चित्रपट चांगली कमाई करेल असे बोले जात आहे.
View this post on InstagramA post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)
दिवस पहिला - 3.5 कोटी रुपये
दिवस दुसरा - 6 कोटी रुपये
एकूण - 9.5 कोटी रुपये
'मेट्रो इन दिनों' चित्रपटात चार जोड्या पाहायला मिळत आहे. चार वेगवेगळ्या प्रेमकथा एका फ्रेममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चित्रपटात 8 मुख्य कलाकार पाहायला मिळत आहे. यात सारा अली खान, आदित्य रॉय कपूर, कोंकणा सेन शर्मा, फातिमा सना शेख, पंकज त्रिपाठी, अली फजल, अनुपम खेर आणि नीना गुप्ता यांचा समावेश आहे
Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी