Latest Maharashtra News Live Updates : मुंबईत पावसाची संततधार सुरु, सखल भागांत पाणी साचले
esakal July 06, 2025 09:45 PM
Sindhudurg Live : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठेच पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 52 मिमी पाऊस झाला असून सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Navi Mumbai Live : नवी मुंबईच्या महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडण्याची शक्यता

महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. अजित पवार गटाची नवी मुंबई शहरांमध्ये बैठक पार पडली बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची महिती आहे.

Maharashtra Live : मुंबई गुजरातची राजधानी होती - प्रतापराव जाधव

 शिवसेना अध्यक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात म्हटल्यानंतर महाराष्ट्रात गदारोळ उडाला होता. हा वाद शांत होतो ना होतो तोच आता शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांच्या वक्तव्याने वाद उफाळण्याची शक्यता आहे. 

Mumbai Live : मुंबईत पावसाची संततधार सुरु

राज्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. अनेक सखल भागांत पाणी साठले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.