आषाढी एकादशी निमित्ताने नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील शेतकरी कैलास उगले व कल्पना उगले यांना पंढरपुरात शासकीय महापूजेचा मान मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उगले दाम्पत्यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. शेतकरी कुटुंब असलेले कैलास उगले हे गेल्या १२ ते १५ वर्षांपासून ही वारकरी नियमित पंढरपूरला वारीला जातात. पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाल्याने कैलास उगले यांच्या कुटुंबीयांसह जातेगाव येथील ग्रामस्थ देखील सुखावले आहे.
Ahilyanagar Live Updates: भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग; पर्यटक लुटताय आनंदअहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा परिसरात पावसाची बॅटिंग सुरूच आहे. सततच्या पावसामुळे निसर्गाने कात टाकली असून निसर्गाने हिरवा शालू परिधान केला आहे. भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात विसर्ग सुरू असून परिसरातील छोटे मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पर्यटकांची पावले भंडारदरा परिसराकडे वळत असून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटताय. सततच्या पावसाने भात खाचरे देखील ओसंडून वाहत आहेत. भंडारदरा परिसरात हिरवाईने नटलेल्या निसर्गाचे मनमोहक रूप बघायला मिळतय.
Nashik Live : नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदीनाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटकांना मज्जाव
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने पाणी पातळीत वाढ
- रविवार असल्याने आज पर्यटकांकडून धबधबा परिसरात केली जात आहे गर्दी
- अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात
- स्थानिक पोलिसांचं गृह रक्षक दलाचे जवानही तैनात
Ratnagiri Live: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहितधरणाची रचना अशी आहे कि त्यातून हे मानवनिर्मीत धबधबे निर्माण झालेत
धरण आणि तिथंला धबधबा असा दुहेरी संगम
पावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं
त्यानंतर टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो
यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खोरनीनकोचे धरण भरलं
Mumbai Live Update: ठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळलीठाण्यात मुसळधार पावसामुळे झाडे कोसळली आहे.
PM Modi Live Update: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागतसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे दुःखद निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Live : हिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा - संजय राऊतहिंदीविरोधातील स्टॅलिन यांच्या लढ्याला आमच्या शुभेच्छा आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.
वसई विरार शहरात आज सकाळपासूनच पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली आहे. यामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
साचलेल्या पाण्यातून वाहन चालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत मात्र पाण्यात खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळें अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
Sindhudurg Live : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्टसिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कुठेच पाणी साचल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 52 मिमी पाऊस झाला असून सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 105 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
Navi Mumbai Live : नवी मुंबईच्या महायुतीतून अजित पवार गट बाहेर पडण्याची शक्यतामहायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. अजित पवार गटाची नवी मुंबई शहरांमध्ये बैठक पार पडली बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची महिती आहे.
Maharashtra Live : मुंबई गुजरातची राजधानी होती - प्रतापराव जाधवशिवसेना अध्यक्ष, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरात म्हटल्यानंतर महाराष्ट्रात गदारोळ उडाला होता. हा वाद शांत होतो ना होतो तोच आता शिवसेना खासदार आणि केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांच्या वक्तव्याने वाद उफाळण्याची शक्यता आहे.
Mumbai Live : मुंबईत पावसाची संततधार सुरुराज्यात पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली असून मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. अनेक सखल भागांत पाणी साठले आहे.