इंदोरी, ता. ६ : वराळे येथील भैरवनाथ विद्यालयातर्फे आषाढी दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या प्रांगणात मुख्याध्यापिका ललिता कांबळे यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान केले होते. ‘ज्ञानोबा...तुकाराम’चा जयघोषात व टाळ-मृदंगाचे गजरात दिंडी गावातील प्रमुख मार्गाने
भैरवनाथ मंदिरात आली. येथे वारी रिंगण, फुगडी, भारुड, गवळण, नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. मुख्याध्यापिका कांबळे यांनी ‘संतांचे सामाजिक योगदान’ विषयावर विचार व्यक्त करत मार्गदर्शन केले. ग्रामस्थांच्यावतीने फराळ वाटप होऊन दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन वर्षाराणी दगडे, रोहिणी जंजिरे, बाळासाहेब गाढवे, राजेश पाटील, राकेशकुमार बोरसे व सुरेखा ओव्हाळ यांनी केले.
PNE25V29077