पुण्यातील दौंडमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. वारीला जाणाऱ्या प्रवाशांच्या गळ्याला कोयता लावून आरोपींनी लुटलं होतं. तसेच एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पंढरपूरच्या वाटेवरच ही घटना घडल्यामुळे ग्रामस्थांसह वारकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
नेमकं काय घडलं?
पुण्याच्या दौंड तालुक्यातून ३ ते ४ कुटुंब देवदर्शनासाठी निघाले होते. यादरम्यान, स्वामी चिंचोली परिसरात ७ भाविक चहासाठी वाहनातून खाली उतरले. नंतर त्या ठिकाणी २ अज्ञात व्यक्ती आले. त्यांनी भाविकांच्या गळ्याला कोयता लावून त्यांच्याकडील सोनं लुटलं. तसेच महागडे ऐवज लंपास केले. नंतर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी गुन्हा नोंद करत तपासाला सुरूवात केली.
Beed: सप्तश्रृंगी देवीच्या मिरवणुकीत अघोरी प्रकार, अजित पवार गटाच्या नेत्यानं रस्त्यावर कोंबडा कापला अन् हळद कुंकू वाहून..तसेच आर्टिस्टकडून आरोपीचे रेखाचित्र तयार करून घेतले. पोलिसांनी या रेखाचित्राच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अमीर पठाण आणि विकास सातपुते अशी दोघा आरोपींची नावे आहेत. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. मात्र, आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. पण अखेर तपास करत पोलिसांनी दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
पंढरपुरात जुनी इमारत कोसळली
पंढरपूर शहरातील प्रमुख स्टेशन रस्त्यावर असणारी बुरुड समाज ट्रस्टची जुनी इमारत आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोसळली आहे. यामध्ये रस्त्यावरील दोन भाविक किरकोळ जखमी झाले आहेत.
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून अनेकांची नावे वगळली, तुमचा अर्ज बाद तर झाला नाही ना? चेक करा स्टेप बाय स्टेपइमारत धोकादायक असूनही अंतर्गत वादामुळे कधी पाडली गेली नाही. दरम्यान, आज दुपारी इमारतीच्या छतापासूनचा काही भाग कोसळला. एका चहा विक्रेता करणाऱ्या हातगाड्यावर कोसळले असून, मंदिराकडे जाणाऱ्या प्रमुख स्टेशन रस्त्यावर ही घटना घडल्याची माहिती आहे.