आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक कर्मचारी आपल्या कामगिरीसाठी योग्य ओळख आणि प्रमोशनची वाट पाहत असतो. काही लोकांना दरवर्षी प्रमोशन मिळतं, तर काहीजण अनेक वर्षं उत्कृष्ट काम करूनही त्याच जागेवर अडकून राहतात. पण काही बुद्धिमान आणि स्ट्रॅटेजिक लोक अशा पद्धतीने काम करतात की कमी वेळात मोठी झेप घेतात. काही वियक्तींना अवघ्या 6 वर्षांत 5 प्रमोशन मिळाले आहेत तर चला जाणून घेऊया असेच काही प्रमोशनसाठीचे फॉर्म्युला
काही अनुभवी व्यक्ती सांगतात की, प्रमोशनसाठी केवळ चांगलं काम पुरेसं नाही, तर तुम्हाला पुढच्या पातळीसाठी योग्य आहात हे सिद्ध करणंही तितकंच गरजेचं आहे. त्या केवळ काम करत नाहीत, तर प्रचंड आत्मविश्वासाने पुढाकार घेतात, सीनियर अधिकार्यांपुढे आपल्या कामाची सादरीकरणं करतात आणि सतत सुधारणा करत राहतात.
प्रमोशनसाठीचे फॉर्म्युला
1. स्वतःहून पुढाकार घ्या
प्रमोशनसाठी संधी मिळेपर्यंत थांबू नका. जोपर्यंत तुमचं काम इतरांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत तुम्हाला पुढच्या जबाबदाऱ्या मिळणार नाहीत. कोणतंही प्रोजेक्ट असो, त्यात जबाबदारी स्वीकारा, स्वतःहून पुढाकार घ्या, आणि तुमचं काम योग्य प्रकारे सादर करा.
2. तुमच्या यशाची योग्य सादरीकरणं करा
चांगलं काम करत असाल, तरी ते योग्य लोकांपर्यंत पोहोचवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कोणत्या टप्प्यावर काय साध्य केलं, ते स्पष्टपणे टीम लीडर किंवा मॅनेजमेंटला दाखवा. आकडे, परिणाम, इम्पॅक्ट हे ठळकपणे मांडल्यास तुमचं काम लक्षात राहील आणि त्याचं योग्य श्रेयही तुम्हालाच मिळेल.
3. मनापासून काम करा, केवळ प्रमोशनसाठी नव्हे
केवळ वर जाण्यासाठी कोणतंही काम उचलून घेणं धोकादायक ठरू शकतं. ज्या कामात तुमची रुची आहे, तेच काम करा. जेव्हा काम तुमच्या स्वभावाशी जुळतं, तेव्हा तुम्ही ते अधिक चांगल्या पद्धतीने करता. अन्यथा, मनाविरुद्ध काम केल्यामुळे मानसिक थकवा आणि बर्नआउट होण्याची शक्यता वाढते.
4. सध्याचं काम उत्तम पद्धतीने पार पाडा
कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सध्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण क्षमतेने पार पाडणं आवश्यक आहे. सध्या दिलेलं काम जर तुम्ही आत्मविश्वासाने, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने करता, तर मॅनेजमेंटला तुम्हाला पुढच्या पातळीवर नेणं सोपं वाटतं. सध्याचं काम अर्धवट ठेवून नवीन संधी मागणं हे उलट तुमच्या प्रतिमेलाच धक्का देऊ शकतं.