तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटी (टीपीसीसी) चे सरचिटणीस गडम चंद्रशेखर रेड्डी यांना स्फोटक पदार्थाशी संबंधित एका गंभीर प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी (०५ जुलै २०२५) रात्री १० वाजता त्यांच्या निवासस्थानातून ही अटक करण्यात आली. अटकेनंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ निजामाबाद तुरुंगात पाठवले. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयातील केपीआर कॉलनीतून दोन दिवसांपूर्वी स्फोटके जप्त करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना आधीच अटक केली होती. चौकशीदरम्यान या लोकांनी गडम चंद्रशेखर रेड्डी यांच्याकडून जिलेटिनच्या काड्या आणि इतर धोकादायक साहित्य मिळाल्याचे उघड केले. या विधानाच्या आधारे पोलिसांनी चंद्रशेखर यांना ताब्यात घेतले.
Shocking! क्षणीक सुखासाठी तरुणीचा भलताच उद्योग! लज्जेमुळे वेदनेने व्हिवळत राहिली, नंतर जे घडले त्याने...या प्रकरणात गडम चंद्रशेखर रेड्डी यांचा भाऊ गडम सूर्या याचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. जो अजूनही फरार आहे. पोलिसांनी सूर्याच्या शोधासाठी मोठी मोहीमसुरू केली आहे. लवकरच त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. स्फोटक पदार्थ कुठून आला आणि त्याचा उद्देश काय होता हे शोधण्यासाठी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
या घटनेमुळे तेलंगणाचे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेस पक्षाशी संबंधित एका वरिष्ठ नेत्याच्या अटकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक लोकही या बातमीने चिंतेत आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की ते हे प्रकरण पूर्णपणे उलगडण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि कोणत्याही संशयिताला सोडले जाणार नाही.
Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...सोशल मीडियावर या प्रकरणाची बरीच चर्चा सुरू आहे. अनेक लोक याला मोठा घोटाळा म्हणत आहेत, तर काहींचे मत आहे की तपास पूर्ण होईपर्यंत अंतिम मत देऊ नये. पोलिसांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका आणि तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.