Ice Skating :'महाराष्ट्राच्या यश जामदारचा रौप्यपदकांचा दमदार चौकार'; राष्ट्रीय शॉर्ट ट्रॅक आइस स्केटिंग स्पर्धेत घवघवीत यश
esakal July 07, 2025 07:45 AM

देहरादून (उत्तराखंड) : महाराष्ट्राच्या यश पारिजात जामदारने राष्ट्रीय आइस (स्पीड) स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धेत संस्मरणीय कामगिरी केली. यश याने चार रौप्यपदकांवर नाव कोरत राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा दिमाखात फडकवला.

Success Story: 'संकटावर मात करत डॉ. आदित्य चिंचकर यांची युपीएससीत धडाकेबाज घोडदौड'; मिळवली ४० वी रँक

राष्ट्रीय आइस स्केटिंग अजिंक्यपद स्पर्धा हिमाद्री आईस रिंक, महाराणा प्रताप क्रीडा संकुल, देहरादून येथे आइस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया (आयएसएआय) यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. देशभरातील १९ राज्यांतील ७००हून अधिक राज्यस्तरीय विजेत्या खेळाडूंनी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

यशने महाराष्ट्र राज्य शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग स्पर्धेतील १३ ते १४ वयोगटातील ‘ज्युनियर सी’ गटात दोन रौप्यपदके जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर ५०० मीटर आणि ७७७ मीटर शर्यतींमध्ये आणखी दोन रौप्यपदके पटकावली.

यशने मर्यादित बर्फ प्रशिक्षणाच्या सुविधांमध्येही सातत्यपूर्ण मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर ही कामगिरी साध्य केली. राज्य स्तरावर अव्वल दोन स्थानांमध्ये स्थान मिळवून त्याने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. या यशाबद्दल यशने आपल्या प्रशिक्षक सुबोध पाटील, दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक जी-हून चे, तसेच आपले पालक, नातेवाईक, मित्र, शुभचिंतक आणि आइस स्केटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

Rahul Gandhi: बिहार ही देशातील गुन्हेगारीची राजधानी: राहुल गांधी, खेमका हत्येवरून जोरदार टीका

गेल्या वर्षी यशने राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली होती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करताना पदकांची कमाई केली होती. आता यश येत्या ऑगस्टमध्ये होणाऱ्या आशियाई शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग करंडकासाठी तयारी करीत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.