Himachal Cloudburst:'हिमाचलमध्ये ढगफुटीने पुन्हा नुकसान'; आसपासच्या चार गावांतील शेती, पूल वाहून गेले
esakal July 07, 2025 07:45 AM

सिमला : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात रविवारी सकाळी दोन ठिकाणी झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. बघेईगड गावात सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या ढगफुटीमुळे भूस्खलन होऊन नकरोड-चांजू मार्गावरील पूल वाहून गेला. त्याचप्रमाणे यामुळे आसपासच्या चार गावांचा शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, ढगफुटी आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे जीवित हानी झाल्याची अद्याप कोणताही नोंद झालेली नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

चारा, चांजू, डेहरा आणि बाघेटगड या गावांत वाहने नेण्यासाठी नकरोड-चांजू मार्गावरील पूल हा एकमेव पर्याय होता, तोच वाहून गेल्याने या गावांत वाहनांची ये जा पूर्णपणे थांबली असून, आपत्कालीन वैद्यकीय सेवेची गरज भासल्यास या गावांकडे सध्या कोणताच पर्याय उपलब्ध नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या ठिकाणी आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक पाठविण्यात आले असून, येथे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.

दरम्यान, हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर कांगडा, मंडी आणि सिरमौर येथील प्रशासनाला सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काही मिनिटांतच पूल वाहून गेला

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, या भागात ढगफुटी झाल्यामुळे येथील बघेईगड नाल्याच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली आणि काही मिनिटांतच पाहता-पाहता यावरील लोखंडी पूल वाहून गेला.

Rahul Gandhi: बिहार ही देशातील गुन्हेगारीची राजधानी: राहुल गांधी, खेमका हत्येवरून जोरदार टीका

५६६ ते ७०० कोटींचे नुकसान

१५० घरांची पडझड

३१ वाहनांचे नुकसान

७४ जणांचा मृत्यू

१६४ जनावरांचा मृत्यू

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.