ENG vs IND : टीम इंडिया विजयी चौकारासाठी सज्ज, इंग्लंड रोखणार?
Tv9 Marathi July 07, 2025 09:45 AM

टीम इंडियाने शुबमन गिल याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 336 धावांनी विजय मिळवला. भारताने यासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. आता उभयसंघातील तिसरा सामना हा 10 जुलैपासून होणार आहे. त्याआधी 7 जुलैला अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर इंग्लंड यांच्यात यूथ ओडीआय सीरिजमधील पाचवा आणि अंतिम सामना होणार आहे. अंडर 19 भारतीय संघाला हा सामना जिंकून विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला यजमान इंग्लंडचा हा सामना जिंकून मालिकेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात क्रिकेट चाहत्यांना रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियाला विजयी हॅटट्रिकची संधी

टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. भारताने या मालिकेतील 27 जून रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला लोळवत विजयी सलामी दिली. त्यानंतर इंग्लंडने 30 जूनला भारतावर मात करत मालिकेत बरोबरी साधली. भारताने तिसरा सामना जिंकून 2 जुलैला मालिकेत 2-1 अशा फरकाने आघाडी घेतली. तर 5 जुलैला झालेला चौथा सामना जिंकून भारताने मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडिया अशाप्रकारे मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडवर मात करण्यासह विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी भारताकडे आहे. त्यामुळे टीम इंडिया विजयी चौकार लगावणार की इंग्लंड दुसर्‍यांदा भारतावर मात करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया 5 वा एकदिवसीय सामना केव्हा?

इंग्लंड विरुद्ध इंडिया 5 वा एकदिवसीय सामना सोमवारी 7 जुलै रोजी होणार आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया 5 वा एकदिवसीय सामना कुठे?

इंग्लंड विरुद्ध इंडिया 5 वा एकदिवसीय सामना न्यू रोड, वॉर्सेस्टर, येथे आयोजित करण्यात आला आहे.

इंग्लंड विरुद्ध इंडिया 5 व्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंग्लंड विरुद्ध इंडिया 5 व्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

इंग्लंड विरुद्ध इंडिया 5 वा एकदिवसीय सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहता येईल?

इंग्लंड विरुद्ध इंडिया 5 वा एकदिवसीय सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर सामना मोबाईलवर वॉर्सेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबच्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह पाहता येईल.

इंग्लंडसमोर वैभव सूर्यंवशीला रोखण्याचं आव्हान

इंग्लंडसमोर पाचव्या सामन्यातही भारताच्या 14 वर्षीय वैभव सूर्यंवशीला रोखण्याचं आव्हान असणार आहे. वैभवने या मालिकेतील चारही सामन्यात धमाका केला आहे. वैभवने पहिल्या सामन्यात 48, दुसऱ्या सामन्यात 45, तिसऱ्या सामन्यात 86 आणि चौथ्या सामन्यात 143 धावांची खेळी केली. त्यामुळे इंग्लंडला या मालिकेतील शेवट विजयाने करायचा असेल तर वैभवला रोखावं लागेल. इंग्लंडला यात किती यश येतं हे सामन्यादरम्यानच स्पष्ट होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.