Marathi-Hindi : आपल्या घरात कुत्राही वाघ, ठाकरे बंधूंची दाऊदसोबत तुलना, भाजप खासदाराने डिवचलं
Saam TV July 07, 2025 03:45 PM

Hindi Marathi row in Maharashtra : राज्यात मराठी आणि हिंदीचा वाद पुन्हा एकदा उफळला आहे. मराठी न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदाराला मनसैनिकांनी चोप दिल्यानंतर देशभरात वाद पेटला आहे. मराठी आणि महाराष्ट्रासाठी ठाकरे बंधू एकत्र आले अन् राज्यातील राजकारणाला वेगळे वळण मिळाले. आता परराज्यातील हिंदी भाषिक नेते आक्रमक (Marathi-Hindi language tension) झाले असून ठाकरे बंधू आणि मराठी माणासाला टार्गेट केले जातेय. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही यामध्ये उडी घेतली आहे. वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय. आपल्या घरात कुत्रेही वाघ असतात, असा टोला लगावलाय. त्याशिवाय दुबे यांनी ठाकरे बंधूंची तुला दाऊत आणि मसूद अजहर यांच्यासोबत केली आहे. दुबे यांच्या या वक्तव्यामुळे राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे. (BJP MP compares Thackeray brothers to Dawood and Masood Azhar in language war)

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर लागोपाठ तीन चार पोस्ट करत ठाकरे बंधू आणि मनसेला डिवचले आहे. दुबेने आपल्या एक्स खात्यावर मराठीमध्ये पोस्ट करत ठाकरेंची अप्रत्यक्ष तुलना कुत्र्यासोबत केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा."

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल हिंदी-मराठी वाद आणखी पेटणार ?

मराठी-हिंदी वादात दुबे यांनी कुत्रा आणि वाघ अशी तुलना केली आहे, त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या ठाकरे बंधूंना दुबे यांनी डिवचलेय. दुबे यांच्या पोस्टनंतर सोशल मीडियावर मनसैनिक आणि शिवसैनिकांनी आक्रमक पोस्ट करत दुबे यांच्यावर घणाघात केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून या पोस्टनंतर काय भूमिका घेतली जातेय? याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. मराठी-हिंदी भाषेवर आता पुन्हा एकदा राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मित्र शूट करत राहिले अन् रीलस्टारचा बुडून मृत्यू, तो रील अखेरचा ठरला, भंडाऱ्यात खळबळ ठाकरेंची दाऊदसोबत तुलना -

निशिकांत दुबे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल करताना कुत्रा आणि वाघ यांची तुलना तर केलीच. पण ते यावरच थांबले नाहीत, दुबे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची तुलना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि मसूद अजहर यांच्यासोबत केली आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये दुबे म्हणाले की, मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची मनसे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आणि सलाउद्दीन, मौलाना मसूद अजहर आणि मुंबईत हिंदूंवर अत्याचार करणारा दाऊद इब्राहिम यांच्यात काय फरक आहे? एकाने हिंदू असल्यामुळे अत्याचार केला. दुसऱ्याने हिंदी असल्यामुळे अत्याचार केला. दुबे यांच्या एक्स पोस्टनंतर राज्यात पुन्हा एकदा हिंदी-मराठी वाद तीव्र होण्याची शक्यता आहे. दुबे यांच्या या वक्तव्यावर राज्यातील भाजप नेत्यांकडून काय प्रितक्रिया येते, काय भूमिका घेतली जाते? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मनसे आणि शिवसैनिकांनी सोशल मीडियावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

Muharram : मोहरम उत्सवात दुर्घटना, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.