आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्ट्रेस हा एक कॉमन फॅक्टर झाला आहे. मात्र सततचा ताण हा आरोग्यासाठी हानिकारक ठरतो. असंतुलित आहार, धकाधकीचे जीवन ही स्ट्रेची प्रमुख कारणे असतात. त्यामुळे आहाराच्या बाबतीत काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे. कारण काही पदार्थ असे असतात ज्यामुळे तुमच्या शरीरातील कॉर्टिसॉलची पातळी वाढते. यालाच स्ट्रेस हार्मोन देखील म्हणतात. हे पदार्थ कोणते ते जाणून घेऊया..
कॅफिन
अनेकांना दररोज दिवसभरात जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. मात्र कॉफीमध्ये असलेले कॅफिन आरोग्यासाठी चांगले नसते. कारण यामुळे तुमच्या शरीरात कॉर्टिसॉलची पातळी वाढते. आपण स्ट्रेस कमी करण्यासाठी चहा-कॉफी घेत असतो, मात्र, यामुळे स्ट्रेस अधिकच वाढतो.
तळलेले पदार्थ
बाहेर असताना आपण फास्ट फूड खातो. यामध्ये जास्त करून तळलेले पदार्थ खाल्ले जातात. ते वारंवार खाल्ल्याने शरीरात जळजळ होते आणि रक्तातील साखरेच्या पातळीत चढ-उतार होतात, ज्यामुळेही कॉर्टिसोल वाढते.
अल्कोहोल
जर तुम्ही सातत्याने अल्कोहोलचे सेवन करत असाल तर त्यामुळे कॉर्टिसॉलची पातळी वाढते. जे स्ट्रेसला आमंत्रण देते. याचा रक्तातील साखरेच्या पातळीवरही परिणाम होतो.
अल्ट्रा-प्रक्रिया केलेले अन्न
पॅक केलेले स्नॅक्स, गोड पदार्थ आणि फास्ट फूडमध्ये साखर, चरबी आणि कार्बोहायड्रेट्स जास्त प्रमाणात असतात. यामुळे पोटाच्या समस्या आणि जळजळ होऊ शकते, यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल वाढते.
साखर
गोड पदार्थ हे प्रमाणापेक्षा जास्त खाणे आरोग्यासाठी घातकच ठरते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि याचा स्ट्रेसवरही परिणाम होतो. जेव्हा रक्तातील साखर अचानक कमी होते किंवा वाढते, तेव्हा तुमचा मूड खराब होतो आणि तणावाची पातळी वाढू शकते.