पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अर्जेंटिनाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर मायली यांना फ्युचसाईट दगडाचा पाया असलेला व हाताने कोरलेला चांदीचा सिंह भेट म्हणून दिला आहे. तसेच मोदींनी उपराष्ट्रपती व्हिक्टोरिया व्हिलारुएल यांना मधुबनी पेंटिंग भेट दिली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
चांदीच्या सिंहाचे वैशिष्ट्ये
फ्युचसाईट दगडाचा पाया असलेला चांदीचा सिंह राजस्थानच्या प्रसिद्ध धातूकाम आणि रत्न कलात्मकतेचे उत्तम उदाहरण आहे. हा चांदीचा सिंह धैर्य आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे. तसेच पायासाठी वापरलेला दगड नैसर्गिक सौंदर्य प्रदान करतो. कुशल राजस्थानी कारागिरांनी बनवलेला हा सिंह देशाच्या कलात्मक आणि भूगर्भीय वारशाचे प्रतीक आहे.
अर्जेंटिनाच्या उपराष्ट्रपतींना दिली मधुबनी चित्रकला
पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती व्हिक्टोरिया व्हिलारुएल यांना मधुबनी पेंटिंग भेट दिली. सूर्याचे मधुबनी चित्र बिहारच्या मिथिला प्रदेशातील भारतातील सर्वात जुन्या कलेचे प्रतिनिधित्व करते. नैसर्गिक रंगांसाठी प्रसिद्ध असेलेल्या मधुबनी चित्रकलेद्वारे सणांच्या वेळी भिंती सजवल्या जातात, यामुळे समृद्धी येते आणि आणि नकारात्मकता दूर होते असा समज आहे.
पंतप्रधानांनी भेट दिलेली ही कलाकृती सूर्याला समर्पित आहे, जो ऊर्जा आणि जीवनाचे प्रतीक आहे. सूर्यांभोवती फुलांची नक्षी दिसत आहे. यामध्ये सांस्कृतिक वारसा जपलेला दिसत आहे.
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांना भेट कलश भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद-बिसेसर यांना कलश भेट दिला, यात संगम आणि शरयू नदीचे पवित्र पाणी आहे. तसेच राम मंदिराची प्रतिकृतीही भेट दिली. शरयू नदीच्या पवित्र पाण्याने भरलेला हा कलश, पवित्रता आणि आध्यात्मिक कृपेचे एक प्रतीक आहे. धातूपासून बनवलेला कलश विपुलता आणि पावित्र्य दर्शवितो.
राम मंदिराची ही चांदीची प्रतिकृती भारतातील सर्वात पवित्र आध्यात्मिक स्थळाचे महत्व दर्शविते. उत्तर प्रदेशातील कुशल कारागिरांनी बनवलेली ही प्रतिकृती धार्मिकता भक्ती, सांस्कृतिक अभिमान आणि दैवी आशीर्वाद यांचे प्रतीक आहे. ही कलाकृती उत्तर प्रदेशच्या मंदिर कला आणि धातूकामाच्या समृद्ध वारशाचे प्रतिनिधित्व करते.