प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. हार्बर, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक आणि पाऊस असल्याने गाड्या धीम्या गतीने गंतव्य स्थानापर्यंत पोहचत होत्या. मात्र हार्बर रेल्वेवर काल दुपारच्या सुमारास नेरुळ स्टेशनजवळ रेल्वेची मशीन बंद पडली त्यामुळे नेरुळ ते पनवेल लोकल सेवा ठप्प झाली होती. ही रेल्वेसेवा आता सुरळीत करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तर पावसामुळे आज मध्यरेल्वेची वाहतूक धीम्या गतीने धावत आहे.
शनिवार पासून राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्याचाच फटका मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलला बसला आहे. रविवारी मेगा ब्लॉक जारी केला होता. त्याचबरोबर पावसाची सुद्धा रिपरिप सतत सुरु होती. अशातच नेरुळ स्थानकाजवळ एका रेल्वेची मशीन बंद पडल्याने नेरुळ ते पनवेल दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली होती.
Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हालतांत्रिक बिघाडामुळे रेल्वे इंजिन बंद पडले होते.रात्रभर या मार्गावर काम सुरू असल्याने हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती . सुट्टी असल्याने बाहेर पडलेल्या प्रवाशांचे चांगलेच हाल झालेले पाहायला मिळाले. मात्र आज सकाळी ५ च्या सुमारास ही रेल्वे सेवा सुरळीत झाली असून कामानिमित्त बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
RailOne: रेल्वेचा मोठा निर्णय! RailOne अॅप लाँच; काय सुविधा मिळणार?आज सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला असून मध्य रेल्वेच्या मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेच्या गाड्या ७ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडल्याने रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. सकाळी ऑफिसला निघणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.