दहशतवादी हाफिज सईद लपला कुठे? या तीन वक्तव्यांमधून मिळतात संकेत
GH News July 07, 2025 05:07 PM

मोस्ट वॉटेंड दहशतवादी हाफिज सईद कुठे लपला आहे? यासंदर्भात चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते. त्यानुसार लश्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर या दोघांचे प्रत्यार्पण करण्याची आमची तयारी आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर हाफिज सईद अंडरग्राउंड आहे. त्यामुळे तो कुठे लपला आहे? त्याची चर्चा सुरु आहे.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांत हाफिज सईद याचा अड्डा असल्याचे समजले जाते. परंतु भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर या ठिकाणी काहीच हालचाली दिसत नाही. सर्वत्र शांतता आहे. पाकिस्तान सरकारच्या अधिकाऱ्यांनी या भागाचा ताबा घेतला आहे. यामुळे हाईज सईद नेमका आहे कुठे? हा प्रश्न आहे.

हाफिज सईद कुठे लपला?

  1. ऑपरेशन सिंदूर दरम्यान 12 मे रोजी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी बीबीसी उर्दूला एक मुलाखत दिली होती. त्यावेळी ख्वाजा यांनी म्हटले होती की, पाकिस्तानात पूर्वी दहशतवाद्यांना संरक्षण दिले जात होते. अमेरिका आणि युरोपच्या सांगण्यानंतर त्या दहशतवाद्यांना संरक्षण दिले गेले होते. परंतु आता पाकिस्तानात एकही दहशतवादी नाही. मी गॅरंटीने सांगतो सध्या पाकिस्तानात एकही दहशतवादी नाही.
  2. 5 जुलै 2025 रोजी अल-जजीराला एक मुलाखत पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि खासदार बिलावल भुट्टो झरदारी यांनी दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, हाफिज सईद सध्या कुठे आहे, त्याची माहिती मला नाही. परंतु तो अफगाणिस्तानात असू शकतो. अफगाणिस्तान पाकिस्तानचा शेजारी देश आहे. दोन्ही देशांची सीमा 2600 किमी आहे.
  3. हाफिज सईद याचा मुलगा तल्हा सईद याने 6 जुलै रोजी सांगितले होते की, माझे वडील सेफ लोकेशनवर आहे. तसेच सुरक्षित आहेत. ती सेफ लोकेशन पाकिस्तानच्या बाहेर आहे की पाकिस्तानमध्ये हा प्रश्न आहे.

2015 मध्ये अमेरिकेने हाफिज सईदवर 10 मिलियन डॉलरचे बक्षिस ठेवले होते. एका मुलाखतीत हाफिज म्हणाला होता, माझ्यावर पुरस्कार ठेवण्यात आला आहे. पण कोणी माझे सीक्रेट लोकेशन सांगत नाही. येथील लोकांना दहा मिलियन डॉलर नको आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.