Railway : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय! ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पहिला आरक्षण चार्ट प्रसिद्ध केला जाणार
Saam TV July 08, 2025 12:45 AM

प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने नियोजित करता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या तयारीच्या आणि आरक्षण चार्टच्या वेळेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी चार्टिंगच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

सध्या आरक्षित प्रवाशांचे नाव, कोच आणि बर्थची माहिती असलेले आरक्षण चार्ट तयार केले जातात आणि मूळ स्थानक किंवा दूरच्या स्थानकातून ट्रेन सुटण्याच्या ४ तास आधी प्रसिद्ध केले जातात. रेल्वे बोर्डाच्या निर्देशांनुसार, १०.०७.२०२५ पासून, ट्रेनचा पहिला आरक्षण चार्ट आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी तयार केला जाईल (४ तासांपूर्वीऐवजी).

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

सुधारित चार्टिंग वेळा पुढीलप्रमाणे:

- ज्या ट्रेन ०५.०० ते १४.०० वाजेदरम्यान प्रस्थान करतील, त्या ट्रेनसाठी पहिली आरक्षण यादी आधीच्या दिवशी २१.०० वाजता तयार केली जाईल.

- ज्या ट्रेन १४.०० ते ०५.०० या वेळेत प्रस्थान करतील, त्यांची पहिली आरक्षण यादी त्या ट्रेनच्या प्रस्थानाच्या ८ तास आधी तयार केली जाईल.

- दुसऱ्या आरक्षण चार्टसाठी सध्याच्या प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, जो सध्याच्या तरतुदींनुसार सुरू राहील.

- अंतिम आरक्षण चार्ट ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तयार केला जाईल.

Ind Vs Eng सामन्यानंतर आकाश दीपला अश्रू अनावर, कॅन्सरग्रस्त बहिणीला समर्पित केला विजय

- प्रवासी अंतिम यादी तयार होईपर्यंत रिक्त बर्थसाठी आरक्षण करू शकतील.

- प्रवाशांनी कृपया चार्टिंग वेळेत झालेल्या बदलाची नोंद घ्यावी.

- हा निर्णय प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करता यावे आणि शेवटच्या क्षणी गोंधळ व गर्दी टाळता यावी या उद्देशाने घेतला आहे.

हे सक्रिय पाऊल प्रवासी सेवा आणि परिचालन तयारी सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेच्या वचनबद्धतेवर भर देते, ज्यामुळे कर्मचारी आणि प्रवाशांना दोन्हींचा फायदा होईल.

Pune Fire : सिगारेट पेटवताच आगीचा भडका उडाला, चोराने सहा मोटारसायकल जाळल्या; पुण्यात भयंकर घडलं
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.