पराग ढोबळे
नागपूर : नागपूरहून निघालेले पती- पत्नी नागपूर जिल्ह्याच्या नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरी पुलाजवळ थांबले. नदी आल्याने गाडी थांबवून दोघेही निर्माल्य कान्हन नदीत टाकण्यासाठी पुलावर थांबले. यानंतर दोघांची सेल्फी काढण्यासाठी पतीने मोबाईल काढला. पतीने सेल्फी काढत असतानाच अचानक पत्नीने पुलावरून नदीत उडी मारली. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना रक्कम शनिवारी घडली आहे.
नागपूरच्या रामटेक तालुक्याच्या काचूरवाही गावातील रहिवासी ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या सध्या नागपूरच्या मानेवाडा संकुलात पती विजय साकोरे सोबत राहत होते. दरम्यान शनिवारी दुपारी ज्ञानेश्वरी तिच्या पतीसोबत कारमधून तिच्या मूळ गावी काचूरवाहीकडे निघाले होते. तर वाटेत नवीन कामठी पोलीसस्टेशन हद्दीतील कन्हान नदीच्या नेरी पुलावर पोहोचले.
Fraud Case : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत ३०० कोटींची फसवणूक; शेकडो गुंतवणूकदार अडचणीतसेल्फी काढताच घेतली नदीत उडी
यानंतर दोघांनीही गाडी थांबवली आणि दोघांनीही सोबत सेल्फी फोटो घेतली. त्यानंतर निर्माल्य नदीत फेकू लागले. याचवेळी अचानक ज्ञानेश्वरीने पुलावरून नदीत उडी मारली. हे पाहून तिच्या पतीचे भान सुटले आणि तो ओरडू लागला. मात्र नदीत पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने काही कळण्याच्या आत पत्नी प्रवाहात वाहून गेला. दरम्यान, कामठीच्या नवीन कामठी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.
Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवनदुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक गोताखोरांच्या मदतीने महिलेचा मृतदेह शोधण्यास सुरुवात केली. तर दुसऱ्या दिवशी रविवारी ज्ञानेश्वरीचा मृतदेह पोलिसांना सापडला. कौटुंबिक कलहामुळे महिलेने असे आत्महत्येचे पाऊल उचलले असेल; असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.