डॉ. दिलीप सातभाई
नव्या करप्रणालीअंतर्गत एखाद्या व्यक्तीचे करपात्र उत्पन्न सात लाख रुपये व जुन्या करप्रणाली अंतर्गत पाच लाख रुपयांपेक्षा अधिक झाले, तर कलम ८७अ अंतर्गत उपलब्ध असलेली २५ हजार रुपये व १२,५०० रुपयांची कमाल करसवलत मिळत नाही.
त्यामुळे त्यांच्या संपूर्ण उत्पन्नावर लागू असलेल्या स्लॅब दरांनुसार प्राप्तिकर आकारला जातो. उत्पन्नात थोडीशी वाढ झाल्यासही खूप जास्त कर भरावा लागतो. ही करदायित्वातील विसंगती दूर करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने सीमांत सवलत (मार्जिनल रिलीफ) सुरू केल्याने करदात्यांना दिलासा मिळाला आहे.
या सवलतीमुळे करदात्याचे जेवढे उत्पन्न करसवलतीच्या उंबरठ्याच्या मर्यादेपेक्षा अधिक (सात लाख रुपये किंवा पाच लाख रुपये) होईल तेवढी रक्कम किंवा स्लॅब दरांप्रमाणे असणारा देयकर यात ‘कमी’ असलेली रक्कम करदेयता मानली जाणार आहे. याचा करदात्याला फायदा होणार आहे. मात्र, ही सवलत नव्या प्रणालीत सात लाख २२ हजार २२० रुपये, तर जुन्या प्रणालीत पाच लाख १५ हजार ६३० रुपयांपर्यंत करपात्र उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी उपलब्ध असेल.
करसवलतीचे उदाहरणआर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये वेतन करदात्याचे उत्पन्न नव्या प्रणालीअंतर्गत प्रमाणित वजावट (स्टँडर्ड डिडक्शन) घेतल्यानंतर सात लाख दहा रुपये असल्यास त्याला सीमांत सवलतीचा लाभ घेता येईल. मात्र, त्यांच्या संपूर्ण करपात्र उत्पन्नावर नव्या करप्रणालीअंतर्गत लागू असलेल्या स्लॅब दरांवर म्हणजे २५ हजार २० रुपये कर आकारला जाईल. तथापि, सीमांत सवलतीमुळे त्यास केवळ १० रुपये प्राप्तिकर भरावा लागेल. स्लॅब दराअंतर्गत दायित्व अधिक असले, तरी या सवलतीमुळे अत्यल्प कर भरावा लागणार आहे.
नवी करप्रणाली- मार्जिनल रिलीफ
क्र. करपात्र नव्या प्रणाली- उत्पन्न रु. सात नव्या प्रणालीनुसार
उत्पन्न नुसार देय कर लाखांपेक्षा किती मार्जिनल रिलीफ
(रु.) उपकर सोडून अधिक आहे? अंतर्गत देय कर
१ ७,०१,००० २०१०० १,००० १९,१००
२ ७,०४,००० २०४०० ४,००० १६,४००
३ ७,०७,००० २०७०० ७,००० १३,७००
४ ७,१०,००० २१००० १०,००० ११,०००
५ ७,१३,००० २१३०० १३,००० ८,३००
६ ७,१६,००० २१६०० १६,००० ५,६००
७ ७,१९,००० २१९०० १९,००० २,९००
८ ७,२२,००० २२२०० २२,००० २००
९ ७,२२,२२० २२२२० २२,२२० ०
जुनी करप्रणाली - मार्जिनल रिलीफ
क्र. करपात्र जुन्या प्रणाली- उत्पन्न रु. पाच जुन्या प्रणालीनुसार
उत्पन्न नुसार देय कर लाखांपेक्षा किती मार्जिनल रिलीफ
(रु.) उपकर सोडून अधिक आहे? अंतर्गत देय कर
१ ५,०१,००० १२७०० १,००० ११,७००
२ ५,०४,००० १३३०० ४,००० ९३००
३ ५,०७,००० १३९०० ७,००० ६९००
४ ५,१०,००० १४५०० १०,००० ४५००
५ ५,१३,००० १५१०० १३,००० २१००
६ ५,१५,००० १५५०० १५,००० ५००
७ ५,१५,६३० १५६३० १५,६३० NA
८ ५,१८,००० १६१०० १८,००० NA