सामान्य ज्ञान (General Knowledge) ही केवळ स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी महत्त्वाची नसून, ती आपल्या रोजच्या जीवनातदेखील उपयुक्त ठरते. जेवढं अधिक ज्ञान, तेवढीच जास्त आत्मविश्वासाने संवाद करण्याची क्षमता! त्यामुळेच अनेकांना GK विषयातील भन्नाट प्रश्न आणि त्यांची उत्तरं जाणून घेण्यात रस असतो. अशाच 10 इंटरेस्टिंग प्रश्नांची माहिती आज आपण घेणार आहोत जी तुमच्या ज्ञानात भर घालेल.
सुरुवात करूया सगळ्यात मजेशीर आणि चकित करणाऱ्या प्रश्नाने:
1. One ते Hundred पर्यंत इंग्रजीत ‘A’ अक्षर किती वेळा येतं?
उत्तर: एकदाही नाही! होय, इंग्रजीमध्ये 1 ते 100 अंकांचे स्पेलिंग (जसे One, Two, Three… Ninety Nine, Hundred) वाचल्यावर लक्षात येईल की कुठेही ‘A’ नाही. तर ‘A’ हा पहिल्यांदा ‘One Thousand’ मध्येच येतो.
पुढे पाहूया आणखी काही प्रश्न:2. पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कधी झाली?
उत्तर: पृथ्वीवर जीवनाची सुरुवात सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी झाली होती. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोच्या रिपोर्टनुसार, पृथ्वी सुमारे 4.5 अब्ज वर्ष जुनी आहे आणि सुमारे 4.3 अब्ज वर्षांपूर्वी जीवनासाठी योग्य परिस्थिती निर्माण झाल्या होत्या. मात्र, आतापर्यंतचे सर्वांत जुने जीवाश्म 3.7 अब्ज वर्षांचे आहेत.
3. सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला?
उत्तर: इ.स.पू. 261 मध्ये झालेल्या कलिंग युद्धानंतर.
4. ब्रह्मांडातील सर्वात हलकं मूलद्रव्य कोणतं आहे?
उत्तर: ब्रह्मांडातील सर्वात हलकं मूलद्रव्य म्हणजे “हायड्रोजन” (Hydrogen) आहे.
5. मानव शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?
उत्तर: लिव्हर, जे मेटाबोलिझम नियंत्रित करतं आणि विषारी घटक बाहेर टाकतं.
6. सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान किती आहे?
उत्तर: सुमारे 6000 डिग्री सेल्सियस असते व फोटोस्फिअर, क्रोमोस्फिअर आणि कोरोना असे सूर्यावर मुख्य तीन स्तर असतात
7. मानव मेंदूत किती न्युरॉन्स असतात?
उत्तर: सरासरी मानव मेंदूत सुमारे 86 अब्ज (86 Billion) न्युरॉन्स असतात.
8. महात्मा गांधींनी भारतात पहिला सत्याग्रह कुठे सुरू केला?
उत्तर: महात्मा गांधींनी भारतातील पहिला सत्याग्रह 1917 मध्ये चंपारण, बिहार येथे ब्रिटिशांच्या नीलशेतीच्या अन्यायकारक धोरणाविरोधात सुरू केला होता.
9. शरीरात कोणता अवयव इंसुलिन तयार करतो?
उत्तर: पॅन्क्रियास (अग्न्याशय) हा अवयव इंसुलिन हार्मोन तयार करतो.
10. सिंधू संस्कृतीचा शोध कोणत्या वर्षी लागला?
उत्तर: 1921 साली हडप्पा (आत्ताचे पाकिस्तान) येथे सिंधू संस्कृतीचा शोध लागला.