इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा किताब जिंकणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज यश दयाल मोठ्या अडचणीत सापडला आहे. गाजियाबादच्या इंदिरापूरम भागात राहणाऱ्या एका मुलीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आता गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे यश दयालला आता तुरुंगाची हवा खावी लागू शकते. त्याचं करिअर संकटात सापडू शकतं. लग्नाचं आश्वासन देऊन यश दयालने आपलं आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केलं, असा आरोप युवतीने केला आहे. यश दयाल दीर्घकाळ मला लग्नाच आश्वासन देत राहिला, त्याच बहाण्याने त्याने माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले असं पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.
गाजियाबादच्या इंदिरापूरममध्ये राहणाऱ्या युवतीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत यश दयालवर अनेक गंभीर आरोप केले होते. तिने आपल्या तक्रारीत सांगितलं की, मागच्या पाच वर्षांपासून ती यश दयालसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दरम्यान RCB चा वेगवान गोलंदाज तिचं शारीरिक आणि मानसिक शोषण करत होता. फक्त माझ्यासोबतच नाही, बऱ्याच मुलींसोबत यश दयालचे संबंध आहेत, असा आरोप युवतीने केला. यावेळी पीडितेने चॅटचे स्क्रीनशॉट, व्हिडिओ कॉल आणि फोटो पुरावे म्हणून दाखवले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. यश दयालच्या वडिलांच म्हणणं आहे की, ‘ते या मुलीला ओळखत नाहीत’ ‘याच मुलीने हे आरोप का केले? हे मला समजत नाहीय’ असं यश दयालच्या वडिलांच म्हणणं आहे.
सीएम हेल्पलाइनवर का मदत मागितली?
पीडित मुलीने 21 जूनला सीएम हेल्पलाइनवर तक्रार केली होती. युवतीचा आरोप आहे की, जेव्हा तिने यश दयालला लग्नाच्या आश्वासनाची आठवण करुन दिली, त्यावेळी त्याने तिला मारहाण केली. पीडित मुलीने 14 जून रोजी महिला हेल्पलाइन नंबर 181 वर कॉल केलेला. पण तिथे सुनावणी झाली नाही. म्हणून नाईलाजाने तिने 21 जून रोजी सीएम हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली.
यंदाच्या सीजनमध्ये यश दयालने किती विकेट काढले?
यश दयाल IPL 2025 चा सीजन RCB कडून खेळला. या सीजनमध्ये आरसीबीने पहिल्यांदा आयपीएल किताब जिंकला. या सीजनमध्ये यश दयाल 15 सामने खेळला. त्यात त्याने 13 विकेट काढले. यश दयाल यूपीकडून रणजी क्रिकेट खेळतो.