Missile Attack On Israel : इस्रायलवर मोठा मिसाइल हल्ला, अमेरिका सुद्धा बिथरली, काळजीपोटी घेतला असा निर्णय
GH News July 08, 2025 07:08 PM

इस्रायलने हुतींवर हल्ला केला, तर बंडखोर अजून आक्रमक बनलेत. त्यांनी एक-दोन नाही, 11 बॅलेस्टिक मिसाइल्स डागून इस्रायलला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. त्याशिवाय ड्रोन हल्ला सुद्धा केला. बेन गुरियन एअरपोर्ट आणि अश्कलोन ऊर्जा प्रकल्पाला त्यांनी टार्गेट केलं. हूतींच्या या डबल अटॅकने अमेरिकेचा श्वास सुद्धा रोखला गेला. अमेरिकेने तात्काळ इराकमधील आपल्या बेसवरील रडार एक्टिव केले. त्याशिवाय पॅट्रियट मिसाइल सिस्टिम आणि अन्य एअर डिफेन्स सिस्टिम सुद्धा तैनात केली.

इस्रायलने येमेनमध्ये एअर स्ट्राइक करुन हुतींना टार्गेट केलं. त्यानंतर हुतींकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशी अपेक्षा होती. मेहर न्यूजच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय की, एक-दोन नाही, येमेनकडून 11 बॅलेस्टिक मिसाइल्स डागण्यात आली. यात इस्रायलच्या अनेक भागांना लक्ष्य करण्यात आलं.

इस्रायली फायटर जेट्सना पळवून लावलं

येमेनच्या सैन्याचे प्रवक्ते याह्या सारी म्हणाले की, देशाच्या एअर डिफेन्स सिस्टिमने इस्रायली फायटर जेट्सना पळवून लावलं. याह्या सारी यांच्या दाव्यानुसार, इस्रायलने येमेनमधील अनेक शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. येमेनच्या सैन्याने त्यांना मागे हटायला भाग पाडलं.

मोठी किंमत चुकवावी लागेल

येमेनच्या सैन्याचे प्रवक्त याह्या सारी यांच्यानुसार इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून येमेनी सैन्याने 11 बॅलेस्टिक मिसाइल आणि ड्रोन डागून प्रत्युत्तर दिलं. यात बेन गुरियन एअरपोर्ट, अशदोद बंदर आणि अश्कलोन येथे एका वीज प्रकल्पावर हल्ला करण्यासाठी हायपरसोनिक मिसाइल्सचा वापर करण्यात आला. आम्ही लॉन्च केलेले ड्रोन यशस्वीरित्या टार्गेटपर्यंत पोहोचले. इस्रायल त्यांना रोखू शकला नाही. इस्रायलने आमच्यावर हल्ला करण्याची चूक केली, तर त्यांना त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असं याह्या सारी म्हणाले. या हल्ल्याद्वारे पॅलेस्टिन लोकांच्या सुरक्षेचा आमचा दृढ संकल्प अजून मजबूत झाला.

अमेरिकेने घाबरुन काय केलं?

येमेनच्या या प्रत्युत्तराच्या कारवाई दरम्यान अमेरिकेने इराकमधील आपल्या एअरबेसवरील एअर डिफेन्स सिस्टिम एक्टिव केली आहे. पश्चिमी इराकच्या अल असद एअरबेसवर अमेरिकेची एअर डिफेन्स सिस्टिम एक्टिव झाली आहे. मिसाइल हल्ल्याच्या भितीने अमेरिकेने हे पाऊल उचललय. त्याशिवाय देखरेख टॉवर्सची संख्या सुद्धा वाढवली आहे. सीरियामधून मोठ्या संख्येने अमेरिकी विमानं इराक येथे पोहोचली आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.