राज आणि उद्धव ठाकरेंबाबत जगदगुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांची मोठी भविष्यवाणी; काय घडणार राजकारणात?
GH News July 08, 2025 07:08 PM

मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची घोषणी केली आहे. दोन्ही पक्षांचा 5 जुलै रोजी एकत्र विजयी मेळावाही पार पडला. तसेच सेना मनसेने एकत्र अनेक आंदोलनेही केली आहेत. हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आगामी निवडणूकीत दोन्ही पक्षांना फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच आता दोन्ही पक्षांच्या युतीवर जगदगुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी भाष्य केले आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा मेळ अमेळ आहे

जगदगुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि येथे अनेक विद्वान झाले आहेत, ज्यांनी खूप चांगल्या शिकवणी देऊन स्वतःला देवाला समर्पित केले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा हा मेळ अमेळ आहे. तो जास्त काळ टिकणार नाही. तसेच त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही.’

हिंमत असेल तर त्यांनी बॉलीवूडला हिंदी चित्रपट बनवण्यापासून थांबवावे

पुढे बोलताना सरस्वती महाराज म्हणाले की, ‘आपण हिंदी भाषा कशी थांबवू शकतो? आज मुंबईत बॉलीवूड आहे आणि महाराष्ट्रातील लोक बॉलीवूडच्या कमाईवर जगतात. जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बॉलिवूडला चित्रपट बनवण्यापासून थांबवावे आणि मराठी चित्रपट बनवायला सुरुवात करावी. ते हिंदूंवर नाही तर भारतीयांवर हल्ला करत आहेत, जर त्यांना ते करायचे असेल तर त्यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन ते करावे .

युती जास्त काळ टिकणार नाही

राज ठाकरेंच्या हिंदी मराठी मुद्द्यावर शंकराचार्य म्हणाले की, ‘त्यांनी हा मुद्दा आधीही उपस्थित केला होता पण तो भरती-ओहोटीसारखा आला आणि गेला. मी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र येण्याचे स्वागत करतो, पण ही युती जास्त काळ टिकणार नाही.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.