बँक एफडी न्यूज: रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) रेपो दरात (Repo Rate) कपात केल्यानंतर, देशातील मोठ्या सार्वजनिक आणि खासगी बँकांनी एफडीवरील (FD) व्याजदर कमी केले आहेत. मुदत ठेवींखाली मिळणारे उत्पन्न आता मर्यादित झाले आहे. पण, देशातील काही बँका एफडीवर 8.8 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. त्या बँकांबद्दल आणि त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या व्याजदरांबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एकीकडे, आरबीआयने रेपो दरात कपात केल्यानंतर देशातील प्रमुख बँका त्यांचे व्याजदर कमी करत आहेत. दुसरीकडे, काही बँका अशा आहेत ज्या एफडीवर उत्तम व्याजदर देत आहेत. देशात काही लघु वित्त बँका आहेत, ज्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर उत्तम व्याज देत आहेत. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक सारख्या लघु वित्त बँकांबद्दल बोलायचे झाले तर, या बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी 8.80 टक्के आणि 8.70 टक्के आकर्षक व्याजदर देत आहेत. याशिवाय, इतर अनेक सार्वजनिक आणि खाजगी बँका देखील ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर चांगले व्याज देत आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025 च्या आर्थिक वर्षात रेपो दरात 100 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. जून 2025 च्या बैठकीत आरबीआयने त्यात 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली. त्याच वेळी, फेब्रुवारी आणि एप्रिलमध्ये झालेल्या पतधोरण बैठकीत 25 -25 बेसिस पॉइंट्सची कपात करण्यात आली आहे.
आरबीआयने रेपो दर कमी केल्यापासून, देशातील जवळजवळ सर्व मोठ्या खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांचे व्याजदर सुधारले आहेत. एफडीवरील व्याजदर सुधारित केले गेले आहेत. कारण जेव्हा जेव्हा आरबीआय रेपो दर कमी करते तेव्हा बँकांवरील दबाव देखील कमी होतो. ते कमी व्याजदराने कर्ज देतात. बँका एफडीवरील व्याजदर कमी करतात कारण आता त्यांना निधी उभारण्यासाठी जास्त व्याज द्यावे लागत नाही.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा