136 वर्षांच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, दक्षिण अफ्रिकेचा विक्रमी विजय
GH News July 08, 2025 11:06 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या सामन्यात यजमना दक्षिण अफ्रिकेने झिम्बाब्वे अक्षरश: लोळवलं. बुलावायोच्या क्विंस स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळलेल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने एकहाती सामना जिंकला. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डरने आपल्या कसोटीच्या कर्णधारपदाच्या कारकि‍र्दीत नाबाद 367 धावांची ऐतिहासिक खेळी केली. या जोरावर पहिल्या डावात झिम्बाब्वेने दिलेल्या 170 धावा ओलांडत 626 धावा केल्या आणि डाव घोषित केला. यासह झिम्बाब्वे विरुद्ध 456 धावांची मजबूत आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना झिम्बाब्वेचा संघ 220 धावांवर सर्वबाद झाला. यासह दक्षिण अफ्रिकेने हा साना एक डाव आणि 236 धावांनी जिंकला. या विजयासह मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. या विजयाचा नायक दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार वियान मुल्डर होता. कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत त्रिशतक झळकावणारा पहिला कर्णधार ठरला.

वियान मुल्डरने सांगितलं की, खूप खास, लहानपणी मी स्वप्नात पाहिलेले काहीतरी. देशाचे नेतृत्व करणे हा एक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला मिळू शकणाऱ्या सर्वात मोठ्या सन्मानांपैकी एक आहे. खूप अभिमान आहे. पहिल्या कसोटीत मी ज्या पद्धतीने बाद झालो त्यामुळे मी निराश झालो, खूप चांगले वाटले आणि जोखीम घेतली आणि काही धावा वाया घालवल्या. या सामन्यात येताना, माझे सर्वोत्तम प्रयत्न केले.

दक्षिण अफ्रिकेने या विजयासह कसोटीत सलग 10 वा विजय मिळवला आहे. दक्षिण अफ्रिकेने पहिल्यांदाच सलग दहा कसोटी सामने जिंकले आहेत. दक्षिण अफ्रिका 1889 पासून कसोटी क्रिकेट खेळत आहे. मात्र त्यांना अशी कामगिरी यापूर्वी कधीच करता आली नव्हती. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग 10 कसोटी जिंकणारा दक्षिण अफ्रिका तिसरा संघ आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने दोन वेळा 16-16 सामने जिंकले आहेत. तर वेस्ट इंडिजने 11 सामने सलग जिंकले आहेत.

झिम्बाब्वेचा कर्णधआर क्रेग एर्विनने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. पण हा निर्णय फसला असंच म्हणावं लागेल. दक्षिण अफ्रिकेने जेतेपद जिंकल्यापासून आत्मविश्वास दुणावला आहे.त्यामुळे भेदक गोलंदाजीपुढे काही फलंदाजांचा निभाव लागला नाही. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 170 धावांवर आटोपला. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेने पहिल्याच डावात झिम्बाब्वेचा खेळ संपवला. 626 धावा केल्या आणि डाव घोषित केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.