जळगाव- शहरातील एमआयडीसी परिसरात अवजड गुरुवारी (ता. ३) एक धातूचा तुकडा जमिनीवर पडला होता. हा तुकडा कुठल्या विमानाचा, रॉकेटचा तुकडा असावा, असा कयास लावला जात होता.
परंतु तो परिसरातीलच एका कंपनीच्या निष्काळजीमुळे उंच उडून खाली पडल्याचे समोर आले आहे. एका कंपनीतील ग्राइंडरचा तुकडा असल्याचे तपासात समोर आले असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
एमआयडीसी परिसरातील एस - ७ सेक्टरमध्ये गुरुवारी सायंकाळी १६ किलो वजनाचा लोखंडी धातूचा तुकडा आकाशातून येऊन कोसळला. तो तुकडा आकाशातून पडल्याचे अनेक जण सांगत होते. त्यामुळे पोलिस, महसूल प्रशासन, विमानतळ प्रशासनाकडून तपासणी करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांनी तो तुकडा ताब्यात घेऊन त्याविषयी चौकशी सुरू केली.
Mumbai Crime: नवी मुंबईत खासगी कॉम्प्युटर क्लासमधील शिक्षिकेसोबत धक्कादायक कृत्य, क्लासेसच्या मालकावर गुन्हा दाखलत्या वेळी हा तुकडा ज्या ठिकाणी पडलेला सापडला होता, त्याच्याच जवळपास श्रीराम सेल्स या ठिबक नळ्या तयार करणाऱ्या कंपनीतील ग्राइंडरचा तुकडा असल्याचे समोर आहे. ठिबक नळ्या कापण्यासाठी या ग्राइंडरचा वापर होतो. त्या ग्राइंडरचा हा तुकडा तुटून तो बाहेर उडाला होता. मात्र, कंपनी मालक व कामगारांनी याकडे दुर्लक्ष केले. सोळा किलो वजनी तुकडा एखाद्या माणसावर किंवा धावत्या वाहनावर पडला असता तर जीवित हानी झाली असती. परिणामी तपासाअंती कंपनी मालकाविरुद्ध निष्काळजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.