Soldier Death : सैन्य दलात लेफ्टनंट पदावर कार्यरत सांगलीच्या जवानाला वीर मरण; बिहारमध्ये प्रशिक्षणादरम्यान घडली घटना
Saam TV July 09, 2025 04:45 AM

सांगली : भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर कार्यरत असलेल्या सांगली जिल्ह्यातील तरुणाला बिहारच्या गया येथे वीरमरण आले आहे. गया येथे प्रशिक्षण सुरु असताना अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लेफ्टनंट यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणत त्यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ अंत्यदर्शनासाठी आले होते. 

सांगलीजिल्ह्यातील पलूस या गावातील अथर्व संभाजी कुंभार (वय २६) असे या लेफ्टनंट तरुणाचे नाव आहे. अवघ्या २६ व्या वर्षी अथर्व यांची लेफ्टनंट या महत्त्वाच्या पदावर निवड झाली होती. विशेष म्हणजे अथर्वने आयटी कंपनीतील नोकरी सोडून सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला. यानंतर अथर्वचे बिहार इथल्या गया मध्ये प्रशिक्षण सुरू होता. यावेळी त्याचे आकस्मिक निधन झाले. 

Bhandara : खराब रस्त्यावरील चिखलात अडकली रुग्णवाहिका; गर्भवती महिलेला चिखलातून काढावी लागली वाट

२० किमीचा टप्पा पार केल्यानंतर अचानक मृत्यू 

दरम्यान बिहार राज्यातील गया येथे अथर्व यांचे प्रशिक्षण सुरु होते. या प्रशिक्षणावेळी त्यांनी २० किलोमीटर अंतरचा टप्पा पार केला. यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला होता. यानंतर काही वेळातच अथर्व यांचा मृत्यू झाला आहे. अथर्व यांना त्रास जाणवू लागल्याने सोबत असलेल्या जवानांनी त्यांना सैन्य दलाच्या रुग्णालायात नेले. मात्र तोपर्यटन त्यांचा मृत्यूझाला होता.  

Mokhada News : हुतात्मा स्मारकाच्या निधीचा गैरवापर; स्मारकाच्या जागेवर अतिक्रमण करत बांधले व्यापारी गाळे

गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

या घटनेने कुंभार कुटुंबासह पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. अथर्व यांचा पार्थिव पलूस या त्यांच्या मूळ गावी आणण्यात आला. पार्थिव गावी आल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. याठिकाणी शासकीय इतमामात अथर्वच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अभिवादन करण्यासाठी पलूसकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.