Raj Thackeray orders MNS leaders to avoid media statements : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक स्पष्ट आदेश दिला आहे. ज्यामध्ये, त्यांनी कुणीही कोणत्याहीप्रकारच्या मीडियाशी संवाद साधायचा नाही, तसंच स्वत:च्या प्रतिक्रियांचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकयचे नाहीत, असे बजावले आहे.
याबाबत राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. यामध्ये राज ठाकरे म्हणतात, ‘’एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.’’
तसेच ‘’आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय त्यांनी देखील कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही.’’ असं राज ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत.