Suraj Chavan : गुलीगत सूरज चव्हाणचा स्वॅग लय भारी; 'शेकी शेकी' गाण्यावर धरला ठेका, पाहा VIDEO
Saam TV July 09, 2025 03:45 PM

सध्या सोशल मीडियावर संजू राठोडजच्या 'शेकी' गाण्याने धुमाकूळ घातला आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वजण या गाण्यांवर भन्नाट रील बनवताना दिसत आहे. या गाण्याने तरुणाईला वेड लावले आहे. अशात आता 'शेकी' गाण्यावर 'बिग बॉस मराठी 5' चि विजेता सूरज चव्हाणने (Suraj Chavan) ठेका धरला आहे. त्याने संजू राठोडजच्या 'शेकी' गाण्यावर एक भन्नाट रील बनवली आहे. जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

सूरजनेशेअर केलेल्या रीलमध्ये तो बाइकवर बसून आपल्या खास स्टाइलने गाडी चालवताना दिसत आहे. तसेच रुबाबात चालताना दिसत आहे. पार्श्वभूमी 'शेकी' गाणं वाजत आहे. व्हिडीओतील त्याचा खास अंदाज, स्वॅग चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. त्याच्या या रीलवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'झापुक झुपूक'

अलिकडेच सूरजचा 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपट रिलीज झाला आहे. त्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगली कमाई केली. चित्रपटातील सूरजच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. सूरज चव्हाणचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटात सूरजसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे असे अनेक मोठे कलाकार पाहायला मिळाले.

View this post on Instagram

A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)

बिग बॉस मराठी

सूरज चव्हाणला 'बिग बॉस मराठी'मुळे लोकप्रियता मिळाली. त्याच्या बिग बॉसमधील गेम आणि वागण्यामुळे त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने 'बिग बॉस मराठी 5' ची ट्रॉफी उचलली आणि आपल्या करिअरला सुरूवात केली.

Lagnanantar Hoilach Prem : जीवा करतोय नंदिनीचं मन जिंकण्याचा प्रयत्न, काव्या-पार्थचं नातं कोणतं वळण घेणार? पाहा VIDEO
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.