Alia Bhatt: अभिनेत्री आलिया भट्टची फसवणुक करणाऱ्या तिच्या पर्सनल सेक्रेटरीला अटक करण्यात आली आहे. 5 महिने शोध घेतल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टची सेक्रेटरी वेदिका शेट्टीला बेंगळुरूमधून करण्यात आली अटक. 2021 मध्ये वेदिका शेट्टी आलिया भट्टची पर्सनल सेक्रेटरी म्हणून काम पाहत होती. बनावट बिलांच्या माध्यमातून आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यातून 77 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.
वेदिका शेट्टीविरोधात जुहू पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल होता आणि 5 महिन्यापासून पोलीस तिचा शोध घेत होते. पोलिसांनी तिला बेंगळुरूमधून 5 दिवसांच्या ट्रांझिट रिमांडवर आणलं असून तिला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे.
लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आलिया भट्टच्या पीएला जुहू पोलिसांनी अटक केली आहे. आलियाची आई आणि अभिनेत्री सोनी भट्ट यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला. जुहू पोलिसांनी सुपरस्टार आलिया भट्टची माजी वैयक्तिक सहाय्यक (पीए) वेदिका प्रकाश शेट्टी (32) हिला अटक केली आहे.
भट्ट यांच्या प्रॉडक्शन हाऊस, एटरनल सनशाइन प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेड आणि तिच्या वैयक्तिक खात्यांमधून 76,90,892 रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. बेंगळुरूमध्ये अटक करण्यात आलेल्या शेट्टीला पाच दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले मंगळवारी शहरातील न्यायालयात हजर करण्यात आले. मे 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत दोन वर्षांहून अधिक काळ हा घोटाळा सुरु होता.
काय आहे वेदिका शेट्टीचं काम आणि प्रकरण?वेदिका शेट्टीने एकेकाळी आलिया भट्टसोबत काम केलं होतं आणि तिच्यावर अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याची आणि प्रॉडक्शन हाऊसची जबाबदारी सोपवण्यात आली होती. आता असं समोर येत आहे की, तिने तिच्या पदाचा गैरवापर करून आलियाच्या प्रॉडक्शन हाऊस आणि वैयक्तिक खात्यांमधून पैसे काढले आहेत. सध्या या प्रकरणी आलिया आणि तिच्या टीमकडून कोणतेही विधान आलेलं नाही आणि आता पोलिस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.
आलिया भट्टचे आगामी सिनेमेसध्या आलिया आगामी ‘अल्फा’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमात 25 डिसेंबर 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया हिच्यासोबत अभिनेत्री शर्वरी वाघ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवाय आलिया अभिनेता आणि पती रणबीर कपूर याच्यासोबत दिग्दर्शत संजय लिला भंसाळी यांच्या ‘लव एंड वॉर’ सिनेमात झळकणारी. यासोबतच आणखी काही सिनेमांच्या माध्यमातून आलिया चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.