सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या शिक्षणाचा तसा काही प्रश्नच येत नाही. कारण या दोघांनी क्रिकेटमध्ये पीएचडी केली आहे. कागदोपत्री नसली तर क्रिकेटच्या मैदानात चाहत्यांनी त्यांच्या खेळीसाठी गुण दिले आहेत. पण त्यांच्या पत्नी किती शिकलेल्या आहेत याबाबत मात्र उत्सुकता आहे. सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली आणि सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर या दोघी कायम चर्चेत असतात. आता दोघांपैकी कोणाकडे सर्वात जास्त डिग्री आहेत असा प्रश्न चाहते विचारतात. तर त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळेल. सौरव गांगुलीची पत्नी डोना प्रोफेसर आहे. सचिन तेंडुलकरची पत्नी व्यवसायाने डॉक्टर आहे. त्यामुळे दोघांचा व्यवसायावरून त्यांच्या शिक्षणाचा अंदाज ठरवता येईल.
सौरव गांगुलीची पत्नी डोना गांगुली 2012 पासून भवानीपूर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमध्ये राज्यशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. तसेच तिला नृत्याचीही आवड आहे. त्यामुळे ती नृत्य अकादमीही चालवते. यात मुलांना ती शास्त्रीय नृत्याचे धडे देते. डोना गांगुली यांनी पदव्युत्तर शिक्षणानंतर जाधवपूर विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एम फील आणि पीएचडी केली आहे. 1997 मध्ये सौरव गांगुलीने डोना यांच्याशी लग्न केले. त्यांना एक मुलगी असून तिचं नाव सना गांगुली आहे. सौरव गांगुली एका राजघराण्यातील असून आज तो त्याचा व्यवसाय सांभाळत आहे.
सचिन तेंडुलकरची पत्नी अंजलीने बॉम्बे इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज आणि सर जेते ग्रुप ऑफ हॉस्पिटलमधून पुढील शिक्षण घेतलं. तिने एमबीबीएस पदवी घेतली असून मुंबई विद्यापीठातून बालरोगशास्त्रात सुवर्णपदाक विजेती आहे. सचिन आणि अंजली यांचं पहिल्याच नजरेत प्रेम जडलं होतं. दोघांनी पहिल्यांदा एकमेकांना विमानतळावर पाहिले आणि त्याचं रुपांतर प्रेमात झालं. 24 मे 1995 रोजी अंजली आणि क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनी लग्न केले. तेव्हा सचिन अवघ्या 22 वर्षांचा होता तर अजंली 28 वर्षांची होती. ती त्याच्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे.