फक्त ₹199! पावसात मच्छरांची साथ थांबवणारी स्वस्त आणि सुरक्षित मशीन
Tv9 Marathi July 09, 2025 01:45 AM

पावसाळा सुरू झाला की एकीकडे वातावरण आल्हाददायक होतं, तर दुसरीकडे आरोग्याच्या समस्या डोकं वर काढू लागतात. पावसात साचलेल्या पाण्यामुळं मच्छरांची संख्या प्रचंड वाढते. यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका प्रचंड वाढतो. घरात बसलेले मच्छर त्रास देतातच, शिवाय रात्रीची झोपही हराम करतात. बाजारात मिळणाऱ्या कोइल्स, स्प्रे यांमध्ये धूर आणि विषारी केमिकल्स असतात, जे आरोग्यास हानिकारक ठरतात. पण आता यावर एक सोपा, स्वस्त आणि स्मार्ट उपाय समोर आला आहे Mosquito Killer मशीन.

ही मशीन केवळ ₹199 मध्ये ऑनलाइन मिळते आणि विशेष म्हणजे यात न धूर आहे, न कोणताही विषारी पदार्थ. ही मशीन ‘बग झॅपर लाइट’ तंत्रज्ञानावर काम करते. मशीनमध्ये अल्ट्रावायोलेट (UV) लाइट बसवलेली असते, जी मच्छरांना आकर्षित करते. जेव्हा मच्छर त्या प्रकाशाजवळ येतो, तेव्हा ती मशीन इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्याने त्याला झटपट मारते. या प्रक्रियेमध्ये कोणताही धूर निर्माण होत नाही आणि केमिकल्सही नसल्याने तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत नाही.

ही मशीन कशी वापरायची?

Mosquito Killer Machine वापरणं अगदीच सोपं आहे. तुम्हाला फक्त मशीनचं प्लग सॉकेटमध्ये लावून ‘स्विच ऑन’ करायचं आहे. उरलेलं सगळं काम ही मशीन स्वतः करते. ही मशीन स्वयंचलित पद्धतीने काम करते. त्यामुळे तुम्ही निवांत झोपू शकता, काम करू शकता किंवा लहान मुलांना देखील त्रास न देता याचा वापर करू शकता.

मूल्य आणि खरेदी कुठे कराल?

ही मशीन सध्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर, विशेषतः अ‍ॅमेझॉनवर अवघ्या ₹199 मध्ये उपलब्ध आहे. QUEBERS कंपनीची ही UV LED टेक्नॉलॉजीवर आधारित Mosquito & Insect Killer Lamp आहे. ही मशीन आकाराने लहान असल्याने छोट्या खोल्यांसाठी योग्य आहे. मात्र हवी असल्यास याच प्रकारातील मोठ्या साईझच्या मशीनदेखील बाजारात उपलब्ध आहेत, त्यांची किंमत थोडी जास्त असते. पण स्वस्त, सोपी आणि सुरक्षित उपाययोजना म्हणून ही मशीन एक उत्तम पर्याय आहे.

का घ्यावी ही मशीन?

1. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांपासून घराला संरक्षण

2. कोणताही धूर नाही, त्यामुळे दम्याचा त्रास असलेल्यांसाठीही योग्य

3. विषारी रसायनांचा वापर नाही, लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षित

4. 24×7 वापरासाठी योग्य

5. देखभाल करायला अत्यंत सोपी

सध्याच्या पावसाळी परिस्थितीत याचा उपयोग किती महत्त्वाचा आहे?

देशाच्या विविध भागांमध्ये मान्सून दाखल झालाय आणि काही ठिकाणी सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. दिल्ली-एनसीआरसारख्या ठिकाणीही सकाळपासून पाऊस सुरू आहे. यामुळे वीकेंडचा आनंद जरी वाढला असला, तरी साचलेल्या पाण्यातून मच्छरांचा प्रादुर्भावही वाढलाय. हे मच्छर केवळ चावून त्रास देत नाहीत, तर डेंग्यू-मलेरियासारखे जीवघेणे आजार पसरवतात. त्यामुळे या समस्येवर वेळेत उपाय करणं अत्यावश्यक आहे.

यासाठी ₹199 मध्ये मिळणारी ही Mosquito Killer Machine म्हणजे एक स्मार्ट गुंतवणूक ठरू शकते. कमी किंमतीत आरोग्याचं मोठं रक्षण, असा विचार करता ही मशीन प्रत्येक घरात असायलाच हवी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.