कॉल आला तरी मम्मी-पप्पांना दिसणार नाही BF-GF चं नाव आणि नंबर, मोबाइलमध्ये अशा ट्रिकने करा नंबर सेव
Tv9 Marathi July 09, 2025 05:45 AM

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे, आणि यात मिळणारे फिचर्स दिवसेंदिवस अधिक स्मार्ट होत चालले आहेत. स्मार्टफोन फक्त दैनंदिन कामं सोपी करत नाहीत, तर अनेक वेळा ‘गुप्त’ समस्या सोडवण्याचाही उपाय ठरतात. तुम्हीही कधी अशा स्थितीत आलात का, जेव्हा तुम्ही घरच्यांसोबत असता आणि अचानक तुमच्या iPhone वर कॉल येतो आणि स्क्रीनवर “BF” किंवा “GF” असं नाव झळकतं? मग काय ? सगळ्यांच्या नजरा तुमच्या फोनकडे! आता यासाठी iPhone मध्ये एक अशी भन्नाट ट्रिक आहे, ज्यामुळे नंबर सेव राहतो, पण कॉल येताना ना नाव दिसतं, ना नंबर…

या ट्रिकची खास गोष्ट काय आहे?

ही ट्रिक विशेषतः iPhone यूजर्ससाठी आहे. यासाठी कोणताही थर्ड पार्टी अ‍ॅप, एक्सटेंशन किंवा सेटिंग्जमध्ये खोलात शिरण्याची गरज नाही. काही सेकंदातच तुम्ही ही सेटिंग करू शकता आणि कोणालाही न कळता, तुमचा खास कॉन्टॅक्ट सुरक्षित ठेवू शकता. चला तर बघूया, ही ट्रिक कशी वापरायची:

iPhone मध्ये ही सेटिंग कशी करावी?

1. Contacts अ‍ॅप ओपन करा.

2. ज्याचा नंबर तुम्हाला लपवायचा आहे, तो कॉन्टॅक्ट शोधा.

3. त्या कॉन्टॅक्टवर क्लिक करा आणि वरच्या बाजूला Edit या पर्यायावर टॅप करा.

4. आता Name फील्डमध्ये जाऊन संपूर्ण नाव काढून टाका.

5. नाव काढल्यानंतर त्याच जागी फक्त एकदा space bar दाबा (कोणतंही अक्षर न टाकता).

5. नंतर वरच्या उजव्या बाजूला असलेल्या Done बटणावर टॅप करा.

हे केल्यावर काय होईल?

* त्या कॉन्टॅक्टचा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव राहील.

* कॉल आल्यावर फोन स्क्रीनवर ना नाव दिसेल ना नंबर!

* यामुळे कोणालाही शंका येणार नाही की हा कॉल कोणाकडून येतोय.

* तुम्ही नाव टाकलेलं नसलं, तरी कॉन्टॅक्टमधील इतर माहिती (जसे फोटो, मेल, नोट्स इ.) जसंच्या तसं राहतं.

ही ट्रिक कधी उपयोगी पडते?

* जेव्हा तुम्ही घरच्यांसोबत किंवा सार्वजनिक ठिकाणी असता आणि तुमच्या खास कॉन्टॅक्टचा कॉल येतो.

* जेव्हा तुम्हाला नंबर विसरायचा नाही, पण नाव कुणालाही दाखवायचंही नाही.

* जेव्हा तुम्हाला गोपनीयता राखायची असते आणि कॉल आयडेंटिफिकेशन लपवायचं असतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.