खासदार इमरान मसूद यांची मोठी घोषणा
Bijnor:
काँग्रेस खासदार इमरान मसूद यांनी वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरील लढाई जारी ठेवणार असल्याचे सांगत काँग्रेस सत्तेवर आल्यास एका तासात वक्फ बोर्ड कायदा समाप्त केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. भाजपची सर्व धोरणं जनताविरोधी आहेत. केवळ काँग्रेसच न्याय अन् बंधुभावाबद्दल आग्रह धरतो. काँग्रेसचा नारा ‘द्वेष हटवा, बंधुभाव निर्माण करा’ आहे. वक्फ विधेयकाद्वारे भाजप गरिबांच्या जमिनी हडप करू पाहत आहे. वक्फ कायद्याच्या मुद्द्यावर आम्ही निर्धाराने लढत आहोत असा दावा मसूद यांनी केला आहे. केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यास एक तासाच्या आत वक्फ बोर्ड कायदा समाप्त करण्यात येणार आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी एकजूट होण्याची गरज आहे. समाजाने काँग्रेसला विजयी करण्याचा नारा देण्यास सुरुवात केल्यास भाजपच्या पराभवाला सुरुवात होणार असल्याचा दावा मसूद यांनी केला आहे. तसेच त्यांनी यावेळी बिहारसंबंधी निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर टीका केली आहे.