पैसा आहे ना तयार? बाजारात येणार दिग्गज कंपन्यांच्या आयपीओची लाट, गुंतवणूकदारांसाठी कमाईची सुवर्ण संधी

भारतातील IPO चा बाजार पुन्हा एकदा तेजीत येणार आहे. टाटा कॅपिटल, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया आणि एनएसडीएल यांसारख्या मोठ्या कंपन्या 2025 च्या दुसऱ्या सहामाहीत आपले शेअर्स बाजारात आणण्याची तयारी करत आहेत. या कंपन्यांच्या IPOs मुळे गुंतवणूकदारांना मोठी संधी मिळणार आहे. Axis Capital च्या अहवालानुसार, 71 कंपन्यांना सेबी (SEBI) ची मंजुरी मिळाली आहे, तर 77 कंपन्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. याव्यतिरिक्त, 80 कंपन्यांनी गोपनीय पूर्व-दाखल मार्गाने नियामक प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे बाजारात गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत.
आता आपण या कंपन्यांबद्दल अधिक माहिती घेऊया.
टाटा कॅपिटल :टाटा समूहाची ही कंपनी गैरबँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) आहे. आरबीआयच्या नियमांनुसार, टाटा कॅपिटलला सप्टेंबर 2025 पर्यंत शेअर बाजारात लिस्ट करणे आवश्यक आहे. कंपनी लवकरच आयपीओची तारीख जाहीर करेल. या आयपीओमधून सुमारे 17,200 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. त्यामुळे हा या वर्षातील सर्वात मोठा आयपीओ ठरू शकतो. आर्थिक वर्ष 2025 मध्ये, टाटा कॅपिटलचे कर्ज पुस्तक 1.98 लाख कोटी रुपये होते. त्यांची अनुत्पादीत मालमत्ता (NPA) 1.71% वरून 2.33% पर्यंत वाढली आहेत. कंपनीने अलीकडेच 343 रुपये प्रति शेअर दराने राइट्स इश्यू पूर्ण केला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने टाटा मोटर्स फायनान्सला टाटा कॅपिटलमध्ये विलीन करण्यास मान्यता दिली आहे.
एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया:दक्षिण कोरियाचा एलजी समूह भारतातील एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया या कंपनीचे शेअर्स विकणार आहे. ते 15,000 कोटी रुपयांचे शेअर्स विकून 15% भागीदारी कमी करतील. कंपनीला SEBI ची मंजुरी मिळाली आहे. एलजीची ही भारतातील दुसरी कोरीयन कंपनी असणार आहे जी शेअर बाजारात लिस्ट होईल. यापूर्वी Hyundai Motor ने भारतात लिस्टिंग केले आहे.
एनएसडीएल:NSDL ही भारतातील एक महत्त्वाची डिपॉझिटरी कंपनी आहे. ही कंपनी 3,421.6 कोटी रुपयांचा आयपीओ आणणार आहे. या आयपीओमध्ये आयडीबीआय बँक आणि एनएसई (National Stock Exchange) आपले शेअर्स विकणार आहेत.
इतर कंपन्या:या व्यतिरिक्त, जेएसडब्ल्यू सिमेंट 4,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. हिरो फिनकॉर्पला 3,668 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीची मंजुरी मिळाली आहे. ब्लूस्टोन ज्वेलरी अँड लाइफस्टाईल (Bluestone Jewellery and Lifestyle) 1,000 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. विक्रम सोलर 1,500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि प्रवर्तकांद्वारे 1.745 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे. Kent RO ही कंपनी प्रवर्तकांद्वारे 1.01 कोटी शेअर्सची विक्री करणार आहे. अमंता हेल्थकेअर (Amanta Healthcare) 1.25 कोटी नवीन शेअर्स जारी करणार आहे. जीके एनर्जी 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणि 84 लाख शेअर्सची विक्री करणार आहे. ग्रीव्ह इलेक्ट्रीक मोबिलीटी 1,000 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.
पहिला सहामाहीचा अहवाल:2025 च्या पहिल्या सहा महिन्यांत आयपीओनी चांगली कामगिरी केली आहे. Axis Capital नुसार, या काळात 24 मेनबोर्ड आयपीओ आले. ज्यापैकी 70% आयपीओ प्रीमियम किमतीवर लिस्ट झाले. एचडीबी फायनान्शिअल सर्विसेस (12,500 कोटी रुपये), हेक्सावेअर टेक्नॉलॉजी 8,750 कोटी रुपये, Schloss Bangalore (3,500 कोटी रुपये), आणि एथर एनर्जी 2,981 कोटी रुपये हे त्यापैकी काही प्रमुख आयपीओ होते. यापैकी फक्त पाच आयपीओ प्राइसबँडपेक्षा किमतीपेक्षा कमी किमतीवर लिस्ट झाले, आणि जुलैपर्यंत चार आयपीओ त्यांच्या पहिल्या किमतीपेक्षा कमी किमतीवर व्यवहार करत होते.