उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग ऊन हा अमेरिका, जपान, दक्षिण कोरियाशी सतत युद्धाची भाषा करतो. या देशात काय सुरू आहे हे कधी पोलादी पडद्या आडून बाहेर येत नाही. हा जगातील अज्ञात देश आहे असेच म्हणावे लागेल इतकी दहशत ऊन कुटुंबाची तिथं आहे. पण सध्या या हुकूमशाहला मृत्यूची भीती सतावत आहे. त्याला टार्गेट किलिंगची भीती सतावत आहे. आपल्या आजूबाजूला कोणतीतरी हेरगिरी करत असल्याचे आणि ते सर्व आपल्या मरणावर टपल्याचे शंका त्याला सतावत आहे. त्यामुळे हा हुकूमशाह पुरता हादरला आहे. तो तसाही महिला सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असतो. पण त्याने वैयक्तिक सुरक्षेसाठी खास 12 कमांडो नेमलेले आहेत. त्यांच्याविषयी त्याने एक मोठा निर्णय घेतल्याने अमेरिकेसह अनेक देशाच्या इंटेलिजन्स संस्था अलर्ट झाल्या आहेत.
इस्त्रायल, अमेरिकेची धास्ती; किम हादरला
इराणमध्ये इस्त्रायलने अत्यंत खतरनाक गेम प्लांट केला होता. इस्त्रायलने इराणच्या सुरक्षा यंत्रणेला भगदाड पाडत अनेक कमांडर्सचा खात्मा केला होता. सुरक्षा कवच भेदून इस्त्रायलने केलेल्या कामगिरीने जग अचंबित झाले होते. उत्तर कोरियात सुद्धा ही वार्ता जाऊन पोहचली. मग किमला आपल्या मृत्यूची भीती सतावू लागली. इराणमध्ये कमांडर्सचे टार्गेट किलिंग झाल्यानंतर लागलीच किमने त्याचे सर्व बॉडीगार्ड एका झटक्यात बदलले. ही त्याची खास माणसं होती. त्यांच्यावर त्याचा विश्वास होता. पण त्यांना हटवण्यात आले. उत्तर कोरियाच्या एका साईटवर तो नवीन सुरक्षा अधिकारी आणि बॉडीगार्डसह दिसून आला. आता त्याने जुन्या 12 सुरक्षा रक्षकांचे काय केले याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.
आता नवीन सुरक्षा अधिकारी कोण?
वृत्तामध्ये, किमचा मुख्य अंगरक्षक कोण? त्याचे नाव समोर आलेले नाही. पण सैन्य दलातील एक वरिष्ठ अधिकारी त्याच्या सुरक्षेसाठी नव्याने तैनात करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या अधिकाऱ्याने यापूर्वी सिंगापूर, व्हिएतनाम आणि रशियामध्ये काम केलेले आहे. या सुरक्षा अधिकाऱ्यावर किमचा किती भरवसा आहे, हे लवकरच समोर येईल. पण ताज्या घडामोडीमुळे हा हुकूमशाह घाबरल्याची चर्चा होत आहे. यापूर्वीच्या सुरक्षा रक्षकांची नावे समोर आलेली नव्हती. पण ही मंडळी अनेकदा त्याच्यासोबत छायाचित्रात दिसली होती. दक्षिण कोरियातील एका वृत्तानुसार, त्याने जुना अंगरक्षक किम चोल ग्यू याला एका राज्याच्या संरक्षण विभागाची जबाबदारी सोपवली आहे.
किम जोंग ऊनची सुरक्षा व्यवस्था कशी?
किमच्या सुरक्षेची जबाबदारी एडजुटेंटस नावाच्या खास सुरक्षा पथकाकडे आहे. यामध्ये जवळपास 200-300 जवान आहेत. ते सतत त्याच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असतात. किमच्या सुरक्षेसाठी तिहेरी व्यवस्था आहे. पहिल्या वर्तुळात जवळपास 12 खास सुरक्षा रक्षक तैनात असतात. याच 12 जणांना शस्त्र बाळगण्याची परवानगी आहे. या बॉडीगार्डचे एक वैशिष्ट्ये आहे. जितकी किमची उंची आहे. तितकीच उंची यासुरक्षा रक्षकांची आहे.