इंग्लंड विरुद्ध इंडिया मेन्स टीम यांच्यात 5 मॅचची टेस्ट सीरिज खेळवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला दोन्ही देशाच्या महिला संघात 5 टी 20I सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वात अनुक्रमे आणि प्रत्येकी 1-1 सामना जिंकला. सलग 2 सामने जिंकल्याने भारताला तिसऱ्या सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र इंग्लंडने हा सामना जिंकला आणि मालिकेतील आव्हान कायम राखलं. आता उभयसंघातील चौथा सामना हा एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला रात्री 11 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 10 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला.
इंग्लंडने टॉस जिंकला. कर्णधार टॅमी ब्यूमोंट हीने बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यामुळे आता इंग्लंड भारतीय गोलंदाजांसमोर किती धावांपर्यंत मजल मारणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा आहे. एका बाजूला इंग्लंड पिछाडीवर आहे. इंग्लंडला मालिकेत कायम रहायचं असेल तर जिंकण्याशिवाय पर्याय नाही. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाची सलग तिसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. मात्र इंग्लंडने तसं होऊ दिलं नाही. त्यामुळे आता महिला ब्रिगेड चौथा सामना जिंकून 2006 नंतर इंग्लंडमध्ये टी 20I मालिका जिंकण्याची कामगिरी करणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
दरम्यान इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील चौथा टी 20I सामना हा टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर हाच सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
इंग्लंड टॉसचा बॉस
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (कर्णधार), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, राधा यादव, अरुंधती रेड्डी, स्नेह राणा आणि श्री चरणी.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : सोफिया डंकले, डॅनिएल व्याट-हॉज, अॅलिस कॅप्सी, टॅमी ब्यूमोंट (कर्णधार), एमी जोन्स (विकेटकीपर), पेज स्कॉलफिल्ड, सोफी एक्लेस्टोन, इस्सी वोंग, शार्लोट डीन, लॉरेन फाइलर आणि लॉरेन बेल.