IIT कानपूरमधून शिकला, मेटा कंपनीनं दिलं 2.5 हजार कोटींचं पॅकेज, जॉईंनिग बोनस तब्बल 854 कोटी, को
Marathi July 10, 2025 02:26 PM

आयआयटी कानपूर ते मेटा: आता बातमी तुम्हाला चक्रावणारी… गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन यासारख्या जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार किती? या आशयाच्या अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. पण मेटा कंपनीनं एका भारतीय वंशाच्या अमेरिकन इंजिनियरला तब्बल अडीच हजार कोटींचं पॅकेज ऑफर केलंय. आणि त्यासाठी कंपनीनं जॉईनिंग बोनस दिलाय 854 कोटींचा… पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट

AI आणि टेक्नॉलॉजीच्या जगात सध्या एका भारतीय वंशाच्या इंजिनियरची जोरदार चर्चा आहे. मार्क झुकरबर्ग यांच्या मेटा कंपनीनं भारतीय वंशाच्या अमेरिकन एआय रिसर्चर त्रापित बन्सलला तब्बल 300 दशलक्ष डॉलर – म्हणजेच जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचं पॅकेज ऑफर केलंय. यातील विशेष बाब म्हणजे त्याला मिळणारा 854 कोटींचा जॉइनिंग बोनस! होय, केवळ नोकरी स्वीकारल्याबद्दलच हा बोनस आहे.

कोण आहे त्रापित बन्सल?

त्रापित बन्सल हा मूळचा उत्तर प्रदेशमधील असून त्यानं २०१२ साली IIT कानपूरमधून मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये पदवी घेतली. त्यानंतरचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. अॅक्सेंचरमध्ये रिसर्च अॅनालिस्ट म्हणून सुरुवात केलेल्या त्रापितनं बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून काम केलं. पण खरी झेप त्यानं 2015 साली अमेरिकेत गेल्यावर घेतली.2016 मध्ये त्यानं फेसबुकमध्ये इंटर्नशिप केली आणि पुढील वर्षी ओपनएआयमध्ये ट्रेनी म्हणून काम सुरु केलं. 2018 मध्ये गुगलमध्ये AI रिसर्चर म्हणून रुजू झालेल्या त्रापितनं त्याच वर्षी AI मधील ‘Meta-Learning Systems’ वर संशोधन केलं, ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आलं. 2021 मध्ये त्यानं पीएचडी पूर्ण केली आणि 2022 पासून ओपन एआयमध्ये रिसर्च सायंटिस्ट म्हणून कार्यरत होता.

13 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर मोठं यश!

आता 2025 मध्ये मेटाकडून आलेल्या अब्जोंच्या ऑफरमुळे त्रापित पुन्हा चर्चेत आला आहे. त्यानं आपल्या X (ट्विटर) अकाऊंटवरून ही बातमी शेअर करत मेटा जॉइन करत असल्याचं अधिकृत केलं. केवळ एक इंजिनियर म्हणून नव्हे, तर AI क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचा संशोधक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. त्रापित बन्सल सध्या अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पत्नी आणि मुलीसोबत स्थायिक आहे. 13 वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर त्याला मिळालेलं हे प्रचंड यश हे केवळ त्याच्या प्रतिभेचं नव्हे तर सातत्यपूर्ण जिद्दीचंही उदाहरण आहे. AI च्या झपाट्याने वाढणाऱ्या क्षेत्रात भारतीय तरुणांनी घेतलेली ही भरारी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्रापितसारख्या तरुणांच्या यशकथेमुळे भारतातील नवोदित इंजिनियर्ससाठी एक नवीन दिशा उघडतेय, हे मात्र नक्की!

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.