बॉलिवूडमध्ये सेलिब्रिटींच्या अनेक गोष्टींची चर्चा होत असते. जसं की त्यांचे अफेअर असो, किंवा घटस्फोट. बॉलिवूडमधील अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या लग्नाआधीच प्रेग्नंट राहिल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जसं की आलिया भट्ट, इलियाना डिक्रूज अशा अने अभिनेत्रींची चर्चा झाली होती. पण अजून एक बॉलिवूड अभिनेत्री अशी होती जी एका अभिनेत्याला डेट करत होती. लग्नाआधीच ती प्रेग्नंट राहिली. त्याबद्दल या अभिनेत्रीने स्वत: देखील मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
अभिनेत्री प्रेग्नंट राहिली अभिनेत्री
ही बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया. नेहा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. नेहा सध्या चित्रपटांमध्ये दिसत नाही, पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहा तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही खूप चर्चेत असते. 2018 मध्ये नेहाने अंगद बेदीशी गुपचूप लग्न करून लोकांना आश्चर्यचकित केले होते. एका मुलाखतीत अभिनेत्री सोहा अली खानने खुलासा केला की, हा तिच्यासाठीही हा धक्काच होता. ती नेहाची फारच जवळची मैत्रीण होती. या मुलाखतीत नेहा देखील सोहासोबत उपस्थित होती. नेहा म्हणाली की लग्नापूर्वी ती प्रेग्नंट असल्याने त्यांनी लगेच लग्न करण्याचा निर्णय घेतला.
‘मी प्रेग्नंट होते आणि…’
नेहाने तिच्या जवळच्या मैत्रिणींपैकी एक असलेल्या सोहा अली खानला तिच्या लग्नात आमंत्रित का केल नाही याचं कारण स्पष्ट केलं आहे. नेहा म्हणाली, “त्या वेळी सर्व काही गोंधळलेले होते, मी प्रेग्नंट होते, पण जरी मी सोहाला लग्नात आमंत्रित करू शकले नाही, तरी माझ्या प्रेग्नेंसीबद्दल कळणाऱ्या पहिल्या लोकांपैकी ती एक होती”
‘मी रेस्टॉरंटमध्ये बेशुद्ध पडले…’
नेहा पुढे म्हणाली, ‘मी प्रेग्नंट आहे हे सोहाला सर्वात आधी कळले. आणि कारण मी, सोहा आणि कुणाल खेमू एका रेस्टॉरंटमध्ये जेवत होतो तेव्हा मी बेशुद्ध पडले. दुसऱ्या दिवशी सकाळी, आम्ही पुन्हा भेटलो आणि तेव्हाच मी तिला सांगितले की मी प्रेग्नंट आहे.’
View this post on Instagram
A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)
‘मी प्रेग्नंट असताना अंगद आणि ती डेटिंग करत होती’
मुलाखतीत नेहा म्हणाली, जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा अंगद आणि ती डेटिंग करत होते, पण तेव्हा त्यांचे नाते नवीन होते. त्यामुळे त्यावेळी, त्यांच्या पालकांपेक्षा आमच्या मित्रासोबत हे शेअर करणे आम्हाला सोपे होते, ज्यांना नुकतीच मुले झाली होती. हे एक कठीण काम आहे.’
नेहा म्हणाली, ‘तुम्हाला नेहमी विचारले जाते, ‘हे घडले म्हणून तुम्ही एकत्र आहात का की तुम्हाला खरोखर एकत्र राहायचे आहे का?’ आम्ही एकमेकांवर प्रेम करतो आणि छान राहतो.’ नेहा आणि अंगदने मे 2018 मध्ये लग्न झाले आणि नोव्हेंबरमध्ये त्यांना मुलगी झाली जिचे नाव ठेवले मेहर. आता त्यांना गुरिक हा मुलगा देखील आहे.