उपकुलसचिव आत्महत्येप्रकरणी चौकशी समिती, चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती
Marathi July 11, 2025 10:25 AM

डॉ? बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकूर यांनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. विजय फुलारी व कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप सुसाईड नोटमध्ये करत आत्महत्येचा प्रयत्न केला. याप्रकरणी चौकशीसाठी राज्यपालांच्या आदेशानुसार निवृत्त न्यायाधीश पी.एस. परांजपे यांची समिती नेमली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी 289 च्या प्रस्तावाद्वारे उपकुलसचिव हेमलता ठाकूर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. जर विद्यापीठाच्या एखाद्या उपकुल सचिवाचा अशा पद्धतीने छळ होत असेल तर काम करणाऱया महिला सुरक्षित आहेत काय, असा सवाल करत संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी दानवे यांनी  केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.