Son’s love for his parents: आजच्या काळात आपण अनेकांकडून ऐकतो की मुलगा आई – वडिलांची काळजी घेत नाही. कित्येक आई – वडील तर म्हातारपणी वृद्धाश्रमात असतात. पण एका मुलाने आई – वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तब्बल 10 कोटी रुपये खर्च केले आहेत. आई – वडिलांची इच्छा होती म्हणून मुलाने तब्बल 10 कोटी रुपयांत भव्य मंदिराची स्थापना केली आहे. आई – वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने मंदिराची स्थापना केली आहे. बिहारमधील छपरा जिल्ह्यातील नैनी गावात एक अतिशय सुंदर आणि भव्य मंदिर स्थापन केलं आहे.
मुलाने आई – वडिलांची शेवटी इच्छा म्हणून स्थापन करण्यात आलेल्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिर सिमेंटचा वापर करुन तयार करण्यात आलेलं नाही. मंदिर पूर्णपणे दगडांनी उभारण्यात आलं आहे. दगड आग्रा, राजस्थान, केरळ सारख्या राज्यांमधू आणले गेले आहेत. महागड्या आणि मजबूत दगडांनी बांधलेलं हे मंदिर स्थापत्य आणि कारागिरीचं एक उत्तम उदाहरण आहे. हे मंदिर ‘नैनी द्वारकाधीश मंदिर’ म्हणून ओळखलं जातं आणि मंदिराची कीर्ती दिवसेंदिवस वाढत आहे.
पाच देवतांच्या मूर्तींची स्थापनाआई – वडिलांसाठी उभारण्यात आलेल्या मंदिरात पाच देवतांची स्थापना करण्यात आली. कृष्ण, दुर्गा, गणपती, शंकर आणि हनुमान या पाच देवतांची स्थापना करण्यात आली आहे. भक्त लांबून या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. बिहार शिवाय उत्तर प्रदेश आणि झारखंड येथूल देखील भक्त मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
मुलाने निभावली जबाबदारी, पूर्ण केली आई – वडिलांची शेवटची इच्छामंदिर उभारण्यामागे एक भावूक करणारा इतिहास आहे. नैनी गावातील रहिवासी राजीव सिंह यांनी त्यांच्या पालकांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे मंदिर बांधलं आहे. मंदिराचे पुजारी मनीष कुमार मिश्रा यांच्या मते, राजीव सिंह यांच्या पालकांनी मंदिर बांधण्याचे स्वप्न पाहिलं होतं आणि त्याचा पायाही घातला होता. परंतु दुर्दैवाने, पाया घातल्यानंतर काही वेळाने दोघांचंही निधन झालं.
आई – वडिलांच्या निधनानंतर राजीव सिंह यांनी पालकांची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचा संकल्प हाती घेतला. राजीव सिंग यांनी गुजरात याठिकाणी व्यवसाय सुरु केला. त्याचं संपूर्ण कुटुंब देखील गुजरात येथे आहे. पण गावत त्यांनी असं काम केलं आहे जे कधीच कोणी विसरु शकणार नाही.
भक्ती, समर्पण आणि सेवेचे प्रतीकहे मंदिर केवळ विटा आणि दगडांची रचना नाही तर ते मुलाच्या त्याच्या पालकांप्रती असलेल्या भक्तीचं आणि समर्पणाचे प्रतीक बनले आहे. हे सिद्ध करतं की जर कोणतंही काम खऱ्या मनाने सुरू केलं तर ते इतरांसाठी प्रेरणा बनू शकतं.