भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पहिल्या दोन सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं. त्यामुले आता तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. शुबमन गिल जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकलं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातील दोन्ही डावात शतकी खेळी केली होती. त्यामुळे लॉर्ड्स कसोटी सामन्यातही त्याच्याकडून अपेक्षा आहेत. असं असताना शुबमन गिल आणि नितीश कुमार रेड्डी यांच्यातील संवाद चर्चेचा विषय ठरला आहे. शुबमन गिलने लॉर्ड्सवर नितीश कुमार रेड्डीशी तेलुगूत संवाद साधला. त्याने नितीशला सांगितलं की, बगुंडी रा मावा. पण याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जर तुम्हाला तेलुगु माहिती नसेल तर शुबमनने नेमकं काय सांगितलं ते जाणून घ्या.
इंग्लंडची सलामीची जोडी फोडण्यासाठी शुबमन गिलने 14वं षटक नितीश कुमार रेड्डीकडे सोपवलं. त्याच्या पहिल्या चेंडूवर बेन डकेटला चकवलं. गिलने हा चेंडू पाहताच उत्साहात आला. त्याने स्लिपवरून बगुंडी रा मावा.. असा संवाद साधला. त्याचा मराठीत अर्थ असा की शाब्बास भावा.. गिलच्या या संवादानंतर नितीश कुमार रेड्डीने कमाल केली. इंग्लंडच्या दोन्ही ओपनर्संना तंबूचा रस्ता दाखवला. दुसरीकडे ओली पोप आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी केली आणि डाव सावरला.
नितीश कुमार रेड्डीने पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या. 14वं षटक टाकण्यासाठी आला तेव्हा इंग्लंडच्या बिनबाद 43 धावा झाल्या होत्या. त्यामुळे ही जोडी फोडणं खूपच आवश्यक होतं. बेन डकेट 40 चेंडूत 23 धावा करून खेळत होता. त्याची विकेट मिळणं आवश्यक होतं. अखेर नितीशला यश आलं आणि त्याला तंबूत पाठवलं. त्यानंतर जॅक क्राउली देखील 43 चेंडूत 18 धावा करून खेळत होता. त्यालाही षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केलं.