Anaya Banger : माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर आता अनाया बांगर म्हणून ओळखला जातो. अर्थात आर्यन बांगर आता मुलगी झाली आहे. हीच अनाया बांगर नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. मुलगी बनल्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिचे फोटो, व्हिडीओज पोस्ट करत असते. दरम्यान, अनाया नेमकी मुलगी कशी झाली, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. आता याच सर्व प्रश्नांची उत्तरं स्वत: अनाया देणार आहे. तशी माहिती समोर आली आहे.
अनाया बांगरने केली मोठी घोषणाअनाया बांगरे तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तिने लवकरच माझ्याबद्दल माहिती देणारा एक माहितीपट येत आहे, अशी घोषणा तिने केली आहे. तिने रुग्मालयातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या गळ्यावर एक शस्त्रक्रिया केल्याचे दिसत आहे. याच फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने मी आणखी एक पाऊल टाकले आहे. मी माझ्या ओळखीच्या आणखी जवळ गेली आहे. एक माहितीपट लवकरच येतोय. तुम्ही तयार आहात ना? अशा आशयाचं कॅप्शन तिने आपल्या या पोस्टमध्ये दिलंय.
अनायावर झाल्या दोन शस्त्रक्रिया
View this post on Instagram
A post shared by Anaya Bangar (@anayabangar)
आणखी एका फोटोमध्ये अनाया बांगरने एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करताना दाखवण्यात आले आहे. या व्हिडीओसोबत तिने माझ्यावर ब्रेस्ट ऑगुमेंटेशन आणि ट्रकियल शेव्ह नावाच्या दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं तिनं सांगितलंय. तसेच माझ्या या संपूर्ण प्रक्रियेचा माहितीपट लवकरच यूट्यूबवर येणार आहे, अशी घोषणा तिने केली आहे.
डॉक्यूमेंटरीत नेमकं काय असणार?
View this post on Instagram
A post shared by Anaya Bangar (@anayabangar)
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अनाया बांगरवर वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. तिच्या मुलगी होण्याच्या प्रवासात तिला अनेक अडचणी आल्या आहेत. या सर्व अडथळ्यांना दूर करत तिचा मुलगी होण्याचा हा प्रवास चालू आहे. असे असतानाच आता अनायाची एक डॉक्यूमेंटरी येत आहे. त्यामुळे या डॉक्यूमेंटरीतून तिचा मुलगी होण्याचा प्रवास सर्वांनाच समजणार आहे. अनाया मुलगी नेमकी कशी झाली? याचे उत्तरही कदाचित सर्वांनाच यातून मिळू शकते.