Vastu Tips : देवघरात ठेवा फक्त या दोन मूर्ती, होईल पैशांचा वर्षाव, तिजोरी कधीच नाही राहणार रिकामी
Tv9 Marathi July 11, 2025 03:45 AM

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तुमचं घर कोणत्या दिशेला असावं? घराच्या मुख्य दरवाजाची दिशा कोणती असावी? तुमचं बेडरूम कोणत्या दिशेला असावं? स्वयंपाक घर कोणत्या दिशेला असावं? या संदर्भात वास्तुशास्त्रामध्ये मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

ज्योतिषशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमचं घर जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर तुम्हाला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे ज्या लोकांचा वास्तुशास्त्रावर विश्वास आहे, ते नवीन घर खरेदी करताना किंवा बांधताना वास्तुशास्त्राचा विचार करूनच घर बांधतात.

वास्तुशास्त्रामध्ये जस घरासंबंधित मार्गदर्शन करण्यात आलं आहे, त्याचप्रमाणे तुमच्या घरात कोणत्या वस्तू असाव्यात? कोणत्या वस्तू असू नयेत? याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे. तसेच तुमच्या घरात असणाऱ्या वस्तुंची दिशा कोणती असावी याबाबत देखील सांगण्यात आलं आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास तुमच्या घरातील पाण्याच्या टाकीची दिशा कोणती असावी? एखाद्या विशिष्ट झाडाची दिशा कोणती असावी? देवी -देवतांच्या प्रतिमा कोणत्या दिशेला असाव्यात याबद्दल देखील वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

दरम्यान जर तुमच्या घरात पैसा टीकत नसेल, तुमच्या हातात प्रचंड पैसा येतो, मात्र तो लगेच खर्च होतो. अनावश्यक खर्च वाढला आहे, यावर देखील उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहेत.

वास्तुशास्त्रात घरात पैसा टीकावा, तिजोरी पैशांनी भरलेली राहावी यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मी माता आणि कुबेर यांना धनाचं प्रतिक मानलं जातं. जर तुमच्यावर लक्ष्मी माता आणि कुबेर यांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला आयुष्यात कधी पैशांची कमी भासत नाही. त्यामुळे दररोज लक्ष्मी माता आणि कुबेर यांची पूजा केली पाहिजे. त्यासाठी या दोन मुर्ती देवघरात ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.