तुम्ही अनेकदा तुमच्या किंवा इतरांच्या घराच्या मुख्य दरवाजाला एक लिंबू आणि सात मिरच्या एका धाग्यात बांधून लटकवलेला पाहिल्या असतील, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की घराच्या मुख्य दरवाजाला लिंबू आणि मिरची का लटकवली जाते, ही केवळ एक अंधश्रद्धा आहे की या मागे अजूनही काही कारण आहे? जर असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आज आपण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत.
घराच्या मुख्य दरवाजाला लिंबू आणि मिरची लटकवण्याची परंपरा आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे, यामागे अनेक कारणं आहेत. आपले पूर्वज हे हुशार होते, असं म्हणतात की त्यांच्या प्रत्येक प्रथा परंपरामागे एक विशिष्ट कारण होतं. घराच्या मुख्य दरवाजाला लिंबू आणि मिरची लटकवण्यामागे देखील अशीच काही कारण आहेत.
वास्तुशास्त्रानुसार लिंबू आणि मिरचीमध्ये अशा काही शक्ती आहेत, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरापासून कोसो दूर राहाते. त्यामुळेच कोणतीही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करू नये, म्हणून घराच्या दरवाजाला लिंबू आणि सात मिरच्या अडकवल्या जातात.पूर्वीच्या काळी विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, त्यामुळे लोक या प्रकारचे उपाय करायचे. असंही म्हटलं जातं की मिरची आणि लिंबामुळे घरात कधीही गरीबी येत नाही. घराची कायम प्रगती होत राहाते.
आता या मागचं वैज्ञानिक कारण जाणून घेऊयात, लिंबू आणि मिरचीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमीन सी असते, जे बॅक्टेरियाला नष्ट करते. तुम्ही जेव्हा लिंबू आणि मिरचीला एका धाग्यात बांधतात तेव्हा ते हवेच्या संर्पकात येतात. त्यातून येणारा मंद वास हा बॅक्टेरिया आणि किटकांना घरापासून दूर ठेवतो. पूर्वीच्या काळी कीटकनाशक नसायचे त्या काळात हा उपाय प्रभावी होता.
पूर्वीच्या काळी सर्पदंशाच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात घडायच्या असं म्हणतात की जर तुम्हाला विषारी सर्पानं दंश केला तर तुमच्या जीभेची चव घेण्याची क्षमता नष्ट होते, त्यामुळे चावणारा साप हा विषारी आहे की? बिनविषारी हे टेस्ट करण्यासाठी देखील या मिरची आणि लिंबाचा उपयोग व्हायचा, सर्पदंश झाल्यानंतर तुम्हाला लगेच मिरची आणि लिंबू उपलब्ध व्हावं यासाठी देखील ही प्रथा अस्थित्वात आली असावी असं मानलं जातं. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्या जर कोणाला सर्पदंश झाल्यास कोणत्याही गोष्टीमध्ये वेळ न घालवता संबंधित व्यक्तीला लगेच तातडीनं वैद्यकीय मदत मिळून द्या.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)