Jasprit Bumrah : Video - बुमराहने असाकाही भन्नाट बॉल टाकला, की जगातील तो टॉपचा बॅट्समनही त्याचा 'बोल्ड' पाहतच राहिला!
esakal July 11, 2025 06:45 AM

Bumrah's stunning delivery dismisses Brook : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा जागतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असल्याचे हे वारंवार सिद्ध झालेले आहे. आता सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह प्लेइंग ११ मध्ये परतला आहे. अर्थातच सर्वांच्या नजरा बुमराहाच्या गोलंदाजीवर असणार आहेत.

 बुमराह हा आतापर्यंत कायमच इंडियन टीमच्या कॅप्टनने त्याच्यावर टाकलेल्या विश्वासास पात्र ठरलेला आहे. त्याने अनेकदा भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलेले आहे. त्यामुळे तो एकप्रकारे भारतीय टीमसाठी संकटमोचकच आहे.

आपल्या अप्रतिम आणि वेगवान गोलंदाजीच्या बळावर तो जगातील भल्याभल्या फलंदाजांना क्षणात गारद करतो. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केवळ भारतीयच नाही तर जगभरातील खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी करत असतात.

आजच्या कसोटी सामन्यातही बुमराहने टाकलेला एक भन्नाट बॉल चर्चेचा विषय ठरत आहे. बुमराहने ज्याप्रकारे इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला बोल्ड केले ते खरोखरंच अप्रतिम होते. डोळ्याचं पात लवतं ना लवतं बुमराहचा तो अतिशय वेगवान बॉल असाकाही हॅरी ब्रूकला चकवून स्टॅम्पवर जाऊन आदळाला तो केवळ अप्रतिमच होता. क्षणभर हॅरी ब्रूक देखील आपण बोल्ड कसं काय झालो, या विचाराने त्या उडालेल्या स्टम्पकडे पाहत उभा होता. बुमराहच्या या भन्नाट गोलंदाजीचा व्हिडिओ आता समोर आला असून, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याचबरोबर बुमराहवर कौतुकाचाही वर्षाव होत आहे.

Kapil Sharma Canada Cafe Shooting Video : कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर झालेल्या भयानक गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर!

याआधी एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, परंतु लॉर्ड्स कसोटीत बुमराहने आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. जरी त्याने सुरुवातीचे बळी घेतले नसले तरी हॅरी ब्रूकच्या रूपात इंग्लंडला मोठा धक्का देत एकप्रकारे आपल्या फॉर्ममध्ये पुनरागमन केल्याचेच दिसत आहे.

Liquor Shop Viral Video : दारूसाठी तडफड! ; दुकानाच्या खिडकीच्या ग्रिलमध्येच अडकलं दारूड्याचं डोकं अन् मग...

 हॅरी ब्रूक सध्या आयसीसीचा नंबर-१ कसोटी फलंदाज मात्र तो या डावात फक्त ११ धावा काढू शकला. तर, आपला बुमराह देखील नंबर-१ कसोटी गोलंदाज आहे आणि हे त्याने सिद्धही केलं. अखेर पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने ४ बाद २५१ धावा केल्या होत्या आणि जो रूट ९९ व बेन स्टोक्स ३८ धावांवर नाबाद आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.